आमचा तीन दिवसांचा, तर ठाकरेंचा तीन तासांचा कोकण दौरा

कोकणातील ३ जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ तास दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार!
Praveen Darekar criticizes Chief Minister Uddhav Thackeray's visit to Konkan
Praveen Darekar criticizes Chief Minister Uddhav Thackeray's visit to Konkan

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कोकणी (Konkan) माणसाला विसरली. कोकणी माणसाने शिवसेनेला खूप दिलं. मात्र, शिवसेनेकडून कोकणला कोणतीही मदत झालेली नाही. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोकणला केवळ तीन तास दिले, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे नेते गेली तीन दिवसांपासून कोकणवासियांचे आश्रू पुसूत त्यांना धीर देण्याचे काम करीत आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून घराबाहेर पडून कोकणातील ३ जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ तास दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार! अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याची खिल्ली उडवली. (Praveen Darekar criticizes Chief Minister Uddhav Thackeray's visit to Konkan)

तौक्ते चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. त्यांनी प्रथम रायगड आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्या या कमी वेळेच्या दौऱ्यावर भाजपच्या सर्व नेत्यांकडून कडाडून टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दरेकर बोलत होते.

ते म्हणाले की, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर आम्ही कोकणचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचनामे जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमचा तीन दिवसांचा दौरा, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचा तीन तासांचा दौरा.... कोकणी माणसाला अजूनही मदत मिळाली नाही. नुकसान ग्रस्तांचा आढावा कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तत्काळ अशा वेळी मदत केली जाते. मात्र, तसे न करता कोकणी माणसांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम सरकारकडून करण्यात आले आहे. 

केंद्राकडे  मदतीची मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकार का मदत देण्यासाठी हात आकडता घेत आहे. कोकणी माणसाची सहनशीलता आता संपलेली आहे. त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असेही दरेकर म्हणाले.

घरात बसून दौऱ्याबाबत बोलणं; म्हणजे दुर्घटनाग्रस्तांची थट्टा करणं आहे. केवळ दोन ते तीन तासांच्या दौऱ्याने कोकणातील परिस्थिती समजू शकत नाही. त्यासाठी नुकसानीच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करण्याची गरज आहे. स्वतः हवाई प्रवास करून दोन ते तीन तासांचा दौरा करायचा आणि दुसऱ्याच्या हवाई प्रवास दौऱ्यावर बोटं दाखवायची, हे चुकीचं आहे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा पाहणी दौरा केला. मग त्यांनी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी का केली नाही. गुजरातला मदत करताना महाराष्ट्राला का मदत केली नाही. यावर दरेकर म्हणाले की गोवा, कर्नाटक, राजस्थान येथेही वादळाने नुकसान झाले आहे. पण, गुजरातची अवस्था त्याहून बिकट होती. त्यामुळे पंतप्रधानांनी दौरा केला असावा. 

मुख्यमंत्र्यांचा केवळ  दर्शनाचा कार्यक्रम

विरोधी पक्ष नेते...‘तीन दिवस'...मुख्यमंत्री... ‘तीन तास'... विरोधी पक्षनेते, कोकणवासीयांच्या बांधावर उंबरठ्यावर जाऊन विचारपूस...मुख्यमंत्र्यांचा,केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम' असे ट्विट करत दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

आता लोकांच्या तोंडाला पुसायलाही पानं शिल्लक नाहीत

दुसऱ्या एका ट्विटमध्ये दरेकर यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांचा हा खऱ्या अर्थाने 'वादळी' दौरा! असा मथळा देऊन या दौऱ्याबाबत भाष्य केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वादळ येण्यापूर्वी जसे ३ दिवस प्रशासन कामाला लागते, तसेच आताही झाले. या ‘वादळा’ने फक्त ३ तासांत धूळधाण केली. या ‘वादळा’मुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत.


कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसू नये

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्या शिवसेनेवर कोकणाने प्रेम केले, ज्यांनी सत्ता दिली, त्या कोकणवासियांच्या तोंडाला तरी पानं पुसू नये, अशी अपेक्षा आहे. 21 कोटी कुठे गेले, याचादेखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. इतका खर्च करुनही आरोग्य यंत्रणा आज ढेपाळलेली का आहे? याचे उत्तर पालक मंत्र्यांनी जनतेसमोर द्यावे, असे आवाहनही लाड यांनी केले.

उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले. दीड वर्षानंतर बाहेर पडले.. त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचं काही कारण नाही. माझा हवाई प्रवास नाही. माझा जमिनीवरून प्रवास आहे. तुमचा जमिनीवर प्रवास व तुमचे पाय जमिनीवर राहणं, याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि याबद्दल खूप खूप आनंद, की तुमचे पाय सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत, ते जमिनीवर आहेत, तर आम्हाला आनंद आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व दरेकरांनी काही हवाई प्रवास केलेला नाही.

-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com