अजित पवार चिडून म्हणाले;नितीन राऊत यांना कुठून माहिती मिळाली मला माहित नाही

पंतप्रधानांचा मुंबई दौरा ठरला होता. त्यानंतर त्या बदल करण्यात आला.
sar58.jpg
sar58.jpg

पुणे : पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर पालकमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. काहीसे चिडूनच या प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले. राऊत यांना कुठून माहिती मिळाली. मला माहिती नाही, असे उत्तर देत या विषयावर आणखी बोलायचे त्यांनी टाळले.(Ajit Pawar said angrily; I don't know where Nitin Raut got the information from)

पुण्यातील कोरोना स्थितीच्या आढवा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नितीन राऊत नेमके काय म्हणाले हे मला माहिती नाही. जीआरबाबतही मला माहिती नाही.या विषयात महाविकास आघाडी सरकार म्हणून एक भूमिका आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ. शेवटी या विषयात न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल, असे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘ पंतप्रधानांचा मुंबई दौरा ठरला होता. त्यानंतर त्या बदल करण्यात आला. ते गुजरातला गेले. तिथे त्यांनी हवाई पाहणी केली. गुजरातचा प्रस्ताव नव्हता तरी मदत करण्यात आली तशी मदत महाराष्ट्रालाही करता झाली असती. इतर राज्यांनाही मदत झाली असती तर योग्य झाले असते.’’

पुण्यात गुंडांच्या अंत्यविधीला मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या बाबत विचारले असता, या संदर्भात संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पोलीस आधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारे चूक करणाऱ्या पोलीस आधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, असा इशारा यावेळी पालकमंत्री पवार यांनी दिला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com