लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला १०० तोळे सोन्याचा हार; पण पोलिसांनी उघड केली पतीची चलाखी !

खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्समध्ये जाऊन माहिती घेतली
Gave 1 kg fake gold necklace to wife on wedding anniversary
Gave 1 kg fake gold necklace to wife on wedding anniversary

भिवंडी  ः सुखाने संसार चालावा; म्हणून पती-पत्नी एकमेकांच्या सुख-दुःखात कायमच सोबतच असतात. त्यातच लग्नाचा प्रत्येक वाढदिवस आठवणीत राहावा; म्हणून या दिवशी पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात. अशीच एक भेटवस्तू म्हणून पत्नीला चक्क  100 तोळे सोन्याचा हार पतीने भेट दिला. या भेटीने पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा हार पत्नीला भेट देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत पती हार भेट देताना हिंदी चित्रपटातील गाणं गातानादेखील दिसला.

भिवंडी-कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन बायकोला भेटवस्तू देणाऱ्या पतीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. त्यावेळी बायकोला दिलेला १०० तोळ्याचा हार नकली असल्याची कबुली पतीने दिली. त्यामुळे भिवंडी तालुक्यात या नाट्यमय भेटवस्तूची चर्चा सुरू आहे. (Gave 1 kg fake gold necklace to wife on wedding anniversary)
     
भिवंडीतील तालुक्यातील कोनगाव येथील रहिवासी असलेले बाळा कोळी यांनी दोन दिवसांपूर्वी  आपल्या लग्नाचा वाढदिवस घरातच मोठ्या थाटामाटात साजरा केला. या निमित्ताने आपल्या पत्नीला चक्क 100 तोळे वजनाचा सोन्याचा हार भेट देत गाणे गातानाचा व्हिडीओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे तालुक्यात चर्चासत्र रमले.

कोनगाव पोलिसांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहिला आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांना माहिती दिली, त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाळा कोळी यांना पोलिस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. 

त्यावेळी बाळा कोळी यांनी पोलिसांना सांगितले की हा हार नकली आहे. बाळा कोळी याने हा सोन्याच्या हारासारखा दिसणारा हार कल्याणच्या एका ज्वेलर्समधून खरेदी करून आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला भेट दिला होता. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्समध्ये जाऊन माहिती घेतली असता, ज्वेलर्स मालकाने हा हार नकली असल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच 38 हजार रुपयांना हार खरेदी करण्यात आल्याचे ज्वेलर्स मालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनाही खात्री पटली आणि हार नकली असल्याबाबतही निष्पन्न झाले.

 
किमती वस्तूंचे सोशल मीडियावर प्रदर्शन करू नये 

नागरिकांनी सोन्याच्या अलंकारांचा गाजावाजा करू नये, अशा प्रकारे सोन्याच्या दागिन्यांची माहिती चोरट्यांना समजली तर त्यामुळे चोरी व दरोड्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे कोणतीही बाब सोशल मीडियावर टाकून त्याचे प्रदर्शन करू नये, असे आवाहन भिवंडी-कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com