धनंजय मुंडेंचा मतदार संघात विकास आणि सेवाधर्मही..

परळी मतदार संघातील विकास कामांसासाठी २४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. तर, सेवाधर्मच्या माध्यमातून दहा कोरोनाग्रस्तांच्या कुटूंबियांना विवाहासाठी मदत देण्यात आली.
minister dhnanjay munde  news parali
minister dhnanjay munde news parali

बीड : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे परळी मतदार संघात  सेवाधर्म आणि विकास असे दुहेरी काम सुरु आहे. परळी मतदार संघातील रस्ते बांधकामांसाठी २४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. (Dhananjay Munde's constituency development and service religion too) तर, याच वेळी त्यांनी हाती घेतलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत मतदार संघातील दहा कोरोनाग्रस्तांच्या कुटूंबियांना विवाहासाठी मदत केली आहे. 

परळीकरांनी मोठ्या अपेक्षेने धनंजय मुंडे यांना ३४ हजार मताधिक्क्याने विजयी केले. राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर विश्वास दाखवत महत्वाचे मंत्रीपद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले. धनंजय मुंडे  यांनी मिळालेल्या पद आणि जबाबदारीचा पुरेपूर उपयाोग जिल्हा आणि मतदार संघाच्या विकासासाठी सुरू केल्याचे दिसून येते. 

परळी मतदारसंघातील विविध महत्वाचे रस्ते व पुलांच्या दुरुस्ती व बांधकामांच्या २४ कोटी रुपयांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आल्या आहेत. (Tenders worth Rs 24 crore were issued by the Public Works Department) एकीकडे कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देत असतांनाच दुसरीकडे मतदारसंघातील विविध विकासकामांकडेही धनंजय मुंडे बारकाईने लक्ष देतांना दिसत आहेत.

पोहनेर - सिरसाळा रस्ता रुंदीकरण व मध्ये लहान पुलांचे बांधकाम करणे, हिंगणी - आमला - कान्नापूर - म्हातारगाव - सोनहिवरा रस्ता दुरुस्ती व पुलांचे बांधकाम करणे, देवळा- धानोरा - मूडेगाव - सुगाव - नांदगाव - बर्दापूर - हातोला - तळेगाव रस्त्याची सुधारणा करणे, उजनी - निरपना पुलांचे बांधकाम करणे,  पोहनेर - सिरसाळा - मोहा - गर्देवाडी रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणासह दुभाजक बांधणे, जोडवाडी - धसवाडी दरम्यान पुलांचे बांधकाम करणे आदी कामांसाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता प्रत्यक्षात या कामांना सुरूवात होत आहे. 

तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गरिबांच्या मदतीसाठी सेवाधर्म : सारे काही समष्टीसाठी हा उपक्रमही मुंडे यांच्या वतीने परळीत राबवला जात आहे. (Sevadharma: This initiative is also being implemented by Munde in Parli for all communities.) याअंतर्गत गरजु कुटुंबातील विवाहासाठी प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधीही वितरित करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाच्या या कठीण काळात गरजू कुटुंबांना मदतीचा हात मिळत आहे.

परळीतील सुरेश आढाव, आश्रुबा  होके, माणिकराव पोटभरे, रणजित पुरभय्ये, दौलत सरदार खान पठाण, अजय दंडगुले सलीमखान रासद खान, खेत्रे, तरकसे, कांबळे या कुटूंबियांना धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यलयात निधीचे वितरण गटनेते वाल्मिक कराड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश टाक आदींच्या हस्ते करण्यात आले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com