मी 'त्यांचा' गुरु असे म्हणून 'त्यांना' आणि मलाही अडचणीत आणू नका - शरद पवार

पूर्वी बारामतीत आले असता पवार आपले राजकीय गुरु असल्याचे वक्तव्य मोदींची केले होते. आज अनेक संदर्भात ते वापरले जाते. पवार यांनी आपल्या मुलाखतीतल पुन्हा एकदा याबाबतचे स्पष्टीकरण दिले.
In am Not Political Guru of Modi Clarifies Sharad Pawar
In am Not Political Guru of Modi Clarifies Sharad Pawar

पुणे : मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरु आहे, असे म्हणून मला आणि त्यांनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणी कुणाचा गुरु वगैरे असत नाही. आपल्याला सोयीची भूमीका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबंधांवर प्रकाश टाकला. 

सरकारला सहा महिने पूर्ण होत असताना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादक व खासदार संजय राऊत यांनी पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज 'सामना'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यात त्यांनी राष्ट्रीय राजकारणापासून ते चीन प्रश्नापर्यंत व आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत विविध विषयांवर चर्चा केली. पूर्वी बारामतीत आले असता पवार आपले राजकीय गुरु असल्याचे वक्तव्य मोदींची केले होते. आज अनेक संदर्भात ते वापरले जाते. पवार यांनी आपल्या मुलाखतीतल पुन्हा एकदा याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

मोदींनी जाणकारांची मदत घ्यावी

आपण मोदींचे गुरू आहात असे ते म्हणतात. अशा वेळी आपण आपल्या शिष्याला हे सांगायला हवं की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील, असे राऊत यांनी विचारताच पवार म्हणाले, ''मी त्यांचा गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. गुरू वगैरे सोडा, राजकारणात कुणी कुणाचा गुरू वगैरे असत नाही. आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही. बाकी राहिला मुद्दा अर्थव्यवस्थेसंबंधीचा. तर मला असे वाटते की, या सगळय़ा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ इथे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. दुर्दैवाने काय झालं मला माहीत नाही, ते सोडून गेले. आता अशी जी माणसे आहेत, की ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू, त्यांच्याशी पंतप्रधानांनी बोलायला हवे,'' 

आज मनमोहनसिंग यांची गरज

या देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, ''शंभर टक्के ही गरज आहे. कारण मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले, तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. त्या वेळेला आर्थिक संकटातून देश जात होता. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले. त्या मनमोहन सिंगांना मी याचे श्रेय देतो तसे माजी पंतप्रधान नरसिंहरावांनाही देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीचा रस्ता बदलून वेगळय़ा वळणावर गाडी नेली आणि सबंध अर्थव्यवस्था सावरली. आज अशाच प्रयत्नांची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या तज्ञ लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायला हवीत.अशा कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल, अशी माझी खात्री आहे.

देशात सरकार चालवताना डायलाॅग संपला आहे, असे आपल्याला वाटते का, या प्रश्नावर पवार म्हणाले, "काही लोकांच्या कामाची हीच पद्धत असते. ती यांचीही असू शकेल. पूर्वी अर्थमंत्री प्रणब मुखर्जी होते, चिदंबरम होते किंवा मनमोहन सिंग होते. त्यावेळी अन्य पक्षांच्या लोकांशी किंवा अन्य जाणकारांशी ते तासनतास चर्चा करीत, तज्ञांची मते जाणून घेत असत. आता तशी तज्ञांची मते जाणून घेतली जातात की नाही मला माहीत नाही. कारण आमच्यासारख्या वेगळय़ा विचारांच्या लोकांना तिथे प्रवेश आहे असं दिसत नाही. त्यामुळे तसा जाणकारांचा सल्ला ते घेतात की नाही माहीत नाही. घेत असले तर तसे परिणाम कुठे दिसायला हवेत, तसे ते दिसतही नाहीत,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com