भारत बायोटेक पुण्याला पळविल्याचा आरोप करणाऱ्या भाजप आमदारास अजितदादांचे उत्तर

तरी मला आनंदच झाला असता.
High Court orders allotment of land in Pune to Bharat Biotech : Ajit Pawar
High Court orders allotment of land in Pune to Bharat Biotech : Ajit Pawar

मुंबई : कोरोना लसनिर्मितीच्या प्रकल्पासाठी भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीला पुणे (Pune) जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा (Land) देण्याचे आदेश खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल, हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली.

भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे (BJP MLA Krishna Khopade) यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. (High Court orders allotment of land in Pune to Bharat Biotech : Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले की, देशावरील कोरोनाचे संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.' (बायोवेट)  कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्तावही राज्य सरकारकडे दिला होता.

त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा; म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन मांजरी (ता. हवेली, जि. पुणे) येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी मी पार पाडली. 

कोरोनापासून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. लसउत्पादनाची गरज आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन भारत बायोटेकला राज्यात लसउत्पादन सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहे. यामागे देशातील नागरिकांना कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी, हाच हेतू आहे, असे स्पष्टीकरण पवार यांनी यासंबंधातील वादावर दिले. 

पुणे, नागपूरसह राज्याच्या कुठल्याही विभागात हा लसनिर्मिती प्रकल्प झाला असता तर माझ्यासह प्रत्येक महाराष्ट्रवासियाला आनंदच झाला असता. भारत बायोटेकच्या प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होत आहे, त्यामुळे अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप निराधार, तथ्यहीन आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केले. 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहिन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com