अंत्यविधीला गर्दी करणे पडले महागात; दोनशे जणांवर गुन्हा दाखल

अंत्यविधीसाठी २० ते २५ जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
Crime filed against 200 participants in funeral procession in Solapur
Crime filed against 200 participants in funeral procession in Solapur

सोलापूर  ः सोलापूर (Solapur) शहरातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे (Karan Mhetre) यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. अंत्ययात्रेतील गर्दी हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच काहींनी बाचाबाची केली होती. कोरोना आपत्ती व्यवस्थान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोनशे जणांवर गुन्हा दाखल केला (Crime filed against 200 participants) आहे. तसेच, म्हेत्रे यांच्या घराचा एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे. (Crime filed against 200 participants in funeral procession in Solapur)

सोलापूर शहातील मोची समाजातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला रविवारी (ता. १६) हजारोच्या संख्येने नागरिक जमले होते. कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात ता. १ जूनपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अंत्यविधीसाठी २० ते २५ जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तरीही म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला सुमारे एक हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. हजारो लोकांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टिनिंगच्या निमयांची ऐशी की तैशी झाली होती. 

कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला सहभागी झालेल्यांपैकी 200 हून अधिक जणांवर सदर बझार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर या घटनेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये; म्हणून करण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा एक किलोमीटरचा परिसर पोलिसांनी बॅरीकेड्‌स लावून सील केला आहे. यामध्ये लष्कर, सरस्वती चौक, ताश्कंद चौक, शास्त्री नगर, सिद्धार्थ चौक, अलकुंटे चौकाचा आदी परिसराचा समावेश आहे.

सोलापूर महापालिकेच्या वतीने ही 200 पत्रांचा शेड आणि 200 बांबू लावून हा परिसर बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मात्र हीच तत्परता पोलिस आणि महापालिका प्रशासनाने अंत्ययात्रेच्या वेळेस दाखवली असती, तर घडलेला प्रकार टाळता आला असता, अशी चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com