जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे विवाहबद्ध! - ZP Member Simantini kokate tie knot withSiddharth Wankhede, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे विवाहबद्ध!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या सिमंतीनी कोकाटे यांचा विवाह सिध्दार्थ वानखेडे यांच्याबरोबर नोंदणी पध्दतीने आज झाला. तत्पूर्वी शहराबाहेरील एका रिसॅार्टवर सर्व धार्मिक व विवाहाचे कार्यक्रम झाले.

सातपूर : सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या सिमंतीनी कोकाटे यांचा विवाह सिध्दार्थ वानखेडे यांच्याबरोबर नोंदणी पध्दतीने आज झाला. तत्पूर्वी शहराबाहेरील एका रिसॅार्टवर सर्व धार्मिक व विवाहाचे कार्यक्रम झाले. 

आज सकाळी या विविहानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भारणे, क्रिडामंत्री सुनिल केदार, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, आमदार डॅा. राहूल आहेर, आमदार राहूल ढिकले, खासदार हेमंत गोडसे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे यांसह राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांनी हजेरी लावली.    

गंगापूर येथील रेसीडींग वॅाटर रिसार्ट येथे कालपासून विवाहाचे विविध पारंपारीक कार्यक्रम झाले. सभागृहात रोशनाई तसेच सजावट होती. काल सायंकाळी साखऱपुडा, हळदी समारंभ, संगीत यांसह भोजन समारंभ झाला. मोजक्या निमंत्रीतांसह येथे आज सकाळी विवाहाचे धार्मिक विधी झाले. या रिसॅार्टमध्ये अत्यंत पोलिस तसेच खाजगी सुरक्षा रक्षकांचा कडक बंदोबस्त होता. 
...
 

हेही वाचा...

अजितदादा म्हणाले, `समोर देखील काही पावर असतील ना?`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख