डॉ. वैशाली वीर यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव मागवला

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० ऑगस्टला डॉ. वीर-झनकर आणि इतर दोघांविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला. जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर, वाहन चालक ज्ञानेश्‍वर येवले, राजेवाडी (ता. नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते पथकाने यांना पकडले. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी डॉ. वीर-झनकर आणि इतर दोघांविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव तत्काळ मागवला आहे.
Zankar ACB 3
Zankar ACB 3


नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० ऑगस्टला डॉ. वीर-झनकर आणि इतर दोघांविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला. (ACB register a case against education officer as well two others) जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर, (Vaishali Zankar) वाहन चालक ज्ञानेश्‍वर येवले(Driver Dnyaneshwar yeole) , राजेवाडी (ता. नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (teacher Pankaj Daspute)  पथकाने यांना पकडले. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी डॉ. वीर-झनकर आणि इतर दोघांविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव तत्काळ (Submit suspension praposal Urgent basis) मागवला आहे. 

शालेय शिक्षण विभाग या प्रकरणामुळे पुन्हा वादाचा भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी विधिमंडळाच्या सभागृहात गैरकारभाराचे प्रकरण गाजल्याने तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालकांना निलंबित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना जाहीर करावा लागला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे गुलदस्त्यात असताना लाचखोरीने आणखी जळजळीत वास्तव पुढे आल्याने सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे निलंबनाचा प्रस्ताव मागवण्याच्या पत्रात शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे. मुळातच, डॉ. वीर-झनकर यांच्या जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पद्धतीविषयी जिल्हा परिषदेचे सभागृह गाजले होते. तरीही शालेय शिक्षण विभागाला डॉ. वीर-झनकर यांना जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती द्यावी कशी वाटली? असा गंभीर प्रश्‍न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. 

यंत्रणेच्या कारभाराविषयी संशय 
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या यंत्रणेच्या कारभाराविषयी संशयाचे ढग तयार झाले आहेत. हा संशय निवळण्यासाठी राज्य सरकारकडून पावले पडत नाहीत. कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्याचे चित्र तयार झाले आहे. अशा परिस्थितीत नाशिकमधील लाचखोरी शिक्षण विभाग यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असल्याचे दिसते. त्यातून हा विभाग आणि यंत्रणा दखल घेणार की सरकारची उरली सुरली प्रतिमा आणखी खड्यात घालणार? याचे उत्तर शालेय शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयातून मिळणार आहे. 

काय म्हटलंय पत्रात? 
लाचलुचपत प्रकरणी डॉ. वीर-झनकर आणि इतर दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केल्याने सरकारची प्रतिमा मलिन झाली. ही बाब लक्षात घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शिस्तभंगाचा प्रस्ताव आणि त्यांच्याविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव सरकारला तत्काळ सादर करावा. शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव सं. द. माने यांनी ही बाब शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहे. 

...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com