लढण्याची जिद्द दाखविणाऱ्या १०८ वर्षांच्या आजींचा जयंत पाटलांनी केला सत्कार

त्याकाळात या जरीना आजींनी लस घेण्यास पुढाकार घेतला.
Jayant Patil felicitated 108 year old Zarina grandmother who took two doses of vaccine
Jayant Patil felicitated 108 year old Zarina grandmother who took two doses of vaccine

सांगली : सुरुवातीच्या काळात तरुणसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास धजावत नव्हते, अशा नकारात्मक वातावरणात १०८ वर्षे वय असलेल्या आजींनी कोरोनाची लस घेतली आणि लढण्याची जिद्द दाखवून दिली. त्या आजींनी सोमवारी (ता. ७ जून) दुसरा डोस घेतला. त्याबद्दल त्या आजींचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साडीचोळी देऊन सत्कार केला. तसेच, सर्वांनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले. (Jayant Patil felicitated 108 year old Zarina grandmother who took two doses of vaccine)

ही गोष्ट आहे, इस्लामपूर शहरातील टकलाईनगरमधील जरीना आजींची. त्यांनी कोरोनाची साथ उच्च पातळीवर असतानाही स्वतःला त्याची लागण होण्यापासून दूर ठेवले. तसेच, सुरुवातीच्या काळात जिथे तरुणाईच्या मनातसुद्धा कोरोना प्रतिबंधक लशीबाबत संभ्रमाचे वातावरण होते, त्याकाळात या जरीना आजींनी लस घेण्यास पुढाकार घेतला. त्यांनी सोमवारी (ता. ७ जून) दुसरा डोस घेतला. त्याबाबतची माहिती सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, आमच्या इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना आजीने लशीचे दोन्ही डोस सोमवारी पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते, हे जरीना आजीने दाखवून दिलं आहे. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे. दरम्यान, कोरोना काळात घरात राहून स्वतःची काळजी घेऊन लसींचे दोन डोस पूर्ण करणाऱ्या १०८ वर्षांच्या या आजींचा पालकमंत्री जयंत पाटील यांनी साडीचोळी देऊन सत्कार केला. 

आता 18 वर्षांवरील सर्वांनाच मिळणार मोफत लस   

राज्यांकडे देण्यात आलेली लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने काढून घेण्यात आली आहे. आता ता. 21 जूनपासून केंद्र सरकारकडूनच राज्यांना लस दिली जाणार आहे. तसेच 18 वर्षांपुढील प्रत्येकाला केंद्राकडूनच मोफत लस दिली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

राज्यांच्या मागणीनुसार ता. 1 मे पासून राज्यांकडे लसीकरणाचे 25 टक्के काम देण्यात आले होते. पण यामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्याने अनेक राज्यांनी हे काम पुन्हा केंद्र सरकारनेच करावे, अशी मागणी होऊ लागली होती. राज्यांना यातील प्रक्रियेतील अडचणी, जगभरातील लशींची उपलब्धता याची जाणीव झाली. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील 18 वर्षांपुढील प्रत्येकाची लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

मोदी म्हणाले, पुढील दोन आठवड्यांनी हा निर्णय लागू केला जाईल. केंद्र व राज्य सरकार मिळून नवीन नियमावली तयार केली जाईल. लसीकरण कार्यक्रमाचे आवश्यक नियोजन केले जाईल. दोन आठवड्यानंतर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिवसापासून 18 वर्षांपासून पुढे सर्वांसाठी मोफत लस दिली जाईल. देशात उत्पादित होणाऱ्या एकुण लशींचा 75 टक्के वाटा भारत सरकार घेऊन राज्यांना मोफत देईल. कोणताही खर्च राज्यांना करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातील कोट्यवधी लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता 18 वर्षापुढील नागरिकांनाही मोफत लस मिळेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com