शिवसेनेला खिंडार; विश्वासघात झाल्याचे सांगून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.
Hundreds of Shiv Sena office bearers from Konkan join NCP
Hundreds of Shiv Sena office bearers from Konkan join NCP

संगमेश्वर (जि. रत्नागिरी) : कसबा पंचायत समिती गणातील कळंबस्ते ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. कळंबस्तेमध्ये शिवसेनेला खिंडार पाडण्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मज्जीदभाई नेवरेकर यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. (Hundreds of Shiv Sena office bearers from Konkan join NCP)

संगमेश्वर तालुक्यातील कसबा पंचायत समिती गणामध्ये कळंबस्ते ग्रामपंचायतीत महानाट्य पाहायला मिळाले. जी ग्रामपंचायत शिवसेनेच्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आघाडी धर्माला बट्टा लावीत शिवसेनेकडे घेतली. त्याच ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सदस्यासह शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली ती राष्ट्रवादीचे मज्जीदभाई नवरेकर यांनी. 

पक्ष वाढीसाठी मज्जीद भाईचे योगदान पाहून आमदार निकम यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांना आमदार शेखर निकम यांनी धन्यवाद देऊन आपण कायम आपल्यासोबत असल्याचा विश्वास दिला. या वेळी उपसरपंच श्रीमती साबिया नेवरेकर, सदस्य अकबर काका दसुरकर यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. 

ते म्हणाले, आम्ही शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होतो. ज्यावेळी कळंबस्ते मोहल्ल्यात शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नसताना आमची हार होणार,हे माहिती असताना गावाचा विरोध पत्करून निव्वळ शिवसेनेच्या प्रेमापोटी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होतो. ज्यांनी आम्हाला शिव्याशाप दिले, ज्यांच्याबरोबर लढत दिली. त्यांनाच दिवस उजाडायच्या आत शिवसेनेत प्रवेश दिला, तोही आम्हाला अंधारात ठेऊन. एकीकडे आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत सरपंच हा आघाडीचाच होणार हा विश्वास देऊन ज्या नेतृत्वाने सर्वांचा विश्वासघात केला, अशा नेतृत्वाची चीड आल्याने या राजकारणाचा कंटाळा आल्यानेच आपण आमदार शेखर निकम यांच्यासारखे स्वच्छ नेतृत्व स्वीकारले. 

कळंबस्ते मोहल्ला हा निकम यांच्यासोबत असल्याचा विश्वास येथील जेष्ठ ग्रामस्थ शब्बीर बोट यांनी दिला आहे. सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या राष्ट्रवादी कार्यालयात आमदार निकम यांच्या उपस्थित कळंबस्ते ग्रामपंचायतच्या उपसरपंच साबिया नेवरेकर, ग्रामपंचायत सदस्य, अकबर काका दसुरकर, ग्रामस्थ इकबाल शेखदारे, श्रीमती बिलकीस बोट, शबाना पावसकर, साहिदा पावस्कर, नजीमा बोट, इब्रारार खान, शब्बीर बोट, रीमान पावस्कर, समिध डावे, बुरान बोट, अरमान मुल्ला, सामी नवरेकर, अहमद काझी, अब्दुल आशिफ नवरेकर, किफा नवरेकर, फैजान काझी, कैफ शेख, अयान वाडकर आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com