Gokul Election : राखीव गटात महडिकांना धक्का; सतेज पाटील गटाने जिंकल्या चार जागा : सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू

मात्र, त्यांना सुश्मिता राजेश पाटील यांच्याशी जोरदार टक्कर द्यावी लागली.
Gokul Election : Push the Mahadikas in the reserve group; Satej Patil's group won four seats
Gokul Election : Push the Mahadikas in the reserve group; Satej Patil's group won four seats

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत राखीव गटातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. राखीव गटात असणाऱ्या पाच जागांपैकी सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच जागांपैकी महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाला अवघी एक जागा मिळाली आहे.  

विरोधातील सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने चार जागा जिंकल्या आहेत. गोकुळच्या मतमोजणीत विरोधी गटाने विजयाचे खाते खोलत सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. यात महाडिकांच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे घरातील शौमिका महाडिक या महिला गटातून विजयी झाल्या आहेत. (Gokul Election : Push the Mahadikas in the reserve group; Satej Patil's group won four seats)

दरम्यान, यापुढील मतमोजणीच्या फेऱ्या या सर्वसाधारण गटातील सुरू असून त्यात कांटे टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, या गटात आमदार, मंत्री आणि त्यांचे वारस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला थोड्याच वेळेत होणार आहे. त्यामुळे  त्याकडे कोल्हापूर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 

अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठपासून सुरू झाली आहे. त्यात सुरुवातील राखीव गटातील मतमोजणी करण्यात आली आहे. या राखीव गटातील अनुसुचित जाती गटातून विरोधी म्हणजे पाटील-मुश्रीफ आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे विजयी झाले आहेत. त्यांना ३४६ मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय गटातून अमर पाटील यांनी बाजी मारली असून त्यांनी ४३१ मते घेतली आहेत. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून बयाजी शेळके विजयी झाले आहेत. महिला गटातून अंजना रेडेकर या विजयी झाल्या आहेत. या चार जागा हसन मुश्रीफ-सतेज पाटील गटाने जिंकल्या आहेत.

राखीव गटाचा निकाल आपल्या बाजूने लागताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मिणचेकर यांच्या विजयाची घोषणा होताच सतेज पाटील आणि मिणचेकर यांच्या नावाने कार्यकर्त्यांनी एकच घोष केला.

दरम्यान, महाडिकांच्या घरातून ‘गोकुळ’च्या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या शौमिका महाडिक ह्या विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांना सुश्मिता राजेश पाटील यांच्याशी जोरदार टक्कर द्यावी लागली. महाडिक यांनी ४० मते अधिक घेत विजयश्री खेचून आणली. शौमिका महाडिक विजयी झाल्या असल्या तरी या निवडणुकीत सत्तारूढ गटातील विद्यमान संचालक विलास कांबळे, पी. डी. धुंदरे व विश्वास जाधव हे पराभूत झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com