शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना फडणवीसांची फूस : हसन मुश्रीफ  

फडणवीस यांनी पडळकरांना आता आवरले पाहिजे.
Devendra Fadnavis seduces Padalkars who criticize Sharad Pawar : Hasan Mushrif
Devendra Fadnavis seduces Padalkars who criticize Sharad Pawar : Hasan Mushrif

कोल्हापूर  : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यामुळे राज्यात 105 आमदार असूनही पायरीवर बसून घोषणा द्याव्या लागत आहे. हे दु:ख माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विसरू शकत नाहीत, म्हणून पवार यांना टार्गेट करुन बदनामी करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  पवार यांच्यावर करत असलेल्या टिकेमागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फूस आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. फडणवीस यांनी पडळकरांना आता आवरले पाहिजे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif) यांनी आज (ता. २ जुलै) केले. 

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यावर चुकीच्या पध्दतीने आणि त्यांच्या वयाचा मान न ठेवता टीका करत आहेत. त्यांची ही टीका सर्वसामान्य माणसांनासुद्धा चुकीची वाटत आहे. वास्तविक या मागे दुसरे कोणी नाही, तर देवेंद्र फडणवीसच असल्याची शंका येत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी पडळकरांना तात्काळ आवरेल पाहिजे. 

ग्रामविकास मंत्री म्हणाले, गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत. हे चुकीचे आहे. पडळकरांच्या वक्तव्यावर कोणताही व्यक्ती त्यांना माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना आता आवरले पाहिजे. कारण, पडळकर यांच्या टिकेमागे देवेंद्र फडणवीसांची फूस असावी, अशी शंका येत आहे. महाविकास आघाडीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे अस्तित्वात आली आहे. 

महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून पवार यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात पवारांचा पुढाकार होता. त्यामुळे 105 आमदार विजयी होऊनही पायऱ्यांवर बसून घोषणा द्याव्या लागत आहेत. हे दु:ख देवेंद्र फडणवीस विसरू शकत नाहीत, म्हणून शरद पवार यांना टार्गेट केले जात आहे.

ज्या पवार यांनी आपले आयुष्य लोकसेवेसाठी आणि विकासासाठी घालवले, त्यांची बदनामी केली जात आहे. मात्र, आम्ही पवार यांची बदनामी खपवून घेणार नाही. फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना तातडीने आवरले पाहिजे, अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in