बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा नारायण राणेंना शाप दिला होता, तो खरा ठरतोय 

शिशूपालाचे शंभर गुन्हे पूर्ण झाले तसे राणेंचे १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत.
Balasaheb Thackeray had cursed Narayan Rane then : Bhaskar Jadhav
Balasaheb Thackeray had cursed Narayan Rane then : Bhaskar Jadhav

रत्नागिरी : हिंदु हृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे सिद्धपुरूष होते. ते बोलायचे, ते कालांतराने खरं ठरत होते. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचा शाप असून ते केंद्रीय मंत्री असो वा अन्य काही त्यांची अधोगती निश्चित आहे. शिशूपालाचे १०० गुन्हे पूर्ण झाले होते, तसे नारायण राणे यांचे १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत. त्यांना महाराष्ट्राची माती, परंपरा, वैचारिक भूमिका नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. (Balasaheb Thackeray had cursed Narayan Rane then : Bhaskar Jadhav)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. त्याचे पडसाद जोरात उमटले असून संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. 

याबाबत शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणे म्हणजे संपूर्ण कोकणच्या संस्कार, परंपरा आणि वैचारिक भूमिकेला लागलेला महाकलंक आहे. राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेले वक्तव्य म्हणून आपण त्याकडे पाहत आहोत. राणे जेव्हा मुंबईत आले, तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. तेव्हा मी वक्तव्य केले होते की, बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी फोन झाला. जलील परकार यांच्या फोनवरून राणे यांना तेव्हा दिलेला शाप आहे. ठाकरे सिद्धपुरुष होते. त्यांचे प्रत्येक वक्तव्य कालांतराने खरं ठरत होते. राणे यांना सिद्धपुरुष ठाकरे यांनी दिलेला शाप आहे, त्यांची अधोगती निश्चित आहे. शिशूपालाचे शंभर गुन्हे पूर्ण झाले तसे राणेंचे १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत.

आमदार राजन साळवी म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेना वाढवली. त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी केला तर राणेंना आम्ही सोडणार नाही. ज्या क्षणाला शिवसैनिकांच्या लक्षात आले, त्या क्षणापासून शिवसैनिकांचा उद्रेक जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे, त्याची प्रतिक्रिया उमटली.

आमचा रंग आज दाखवून दिला : राजन साळवी

जनआशीर्वाद यात्रा ही भाजपची आहे. त्यांची वैयक्तिक आहे. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. पण मी नम्रपणे सांगतो, बाळासाहेब ठाकरे यांनी कोकण आणि महाराष्ट्र उभा केला. मात्र, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, राणेंच्या जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही. तसेच झाले. कोकणावर किंवा आमच्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आमचा रंग आज दाखवून दिला आहे. यात्रा त्यांचा विषय आहे, पण शिवसेना उत्तर देण्यास तयार आहे, असेही राजन साळवी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com