आता आम्ही नीलम गोऱ्हेंच्या विरोधात कोर्टात जाणार : चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना पंढरपुरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणाले होते. मग हे तुमचं कसं चालतं?
आता आम्ही नीलम गोऱ्हेंच्या विरोधात कोर्टात जाणार : चंद्रकांत पाटील
Now we will go to court against Neelam Gorhe : Chandrakant Patil

पुणे : नीलम गोऱ्हे ह्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. हे पद पक्षविरहीत असते. त्या पदावरील व्यक्तीचा कुठल्याही पक्षाशी संबंध नसतो. पण, आमदार नील गोऱ्हे ह्या कायम आपल्या शिवसेना पक्षाच्या बाजूने बोलत असतात. आता आम्ही त्यांची स्टेटमेंट आणि आर्टिकल जमा करत असून लवकरच न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिला. (Now we will go to court against Neelam Gorhe : Chandrakant Patil)

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून दुपारी अडीचच्या सुमारास अटक करण्यात आली. तत्पूर्वी या प्रकरणी सकाळी पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी उपसभापती गोऱ्हे यांना लक्ष केले होते.  

आमदार पाटील म्हणाले की, विधान परिषेदचे उपसभापती पद हे पक्षविरहीत असते. त्या पदावर सध्या शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे विराजमान आहेत. मात्र, त्या कायम आपल्याच पक्षाची बाजू घेऊन बोलत असतात. त्यांची काही विधाने आणि आर्टीकल आम्ही जमा करीत आहोत. लवकरच याबाबत आम्ही त्यांच्याविरोधात कोर्टातही जाणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांना राज्य सरकार अटक करू शकत नाही, असा दावाही आज सकाळी पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र, त्यानंतर आज दुपारी रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री राणे यांना अटक केली आहे. 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना पंढरपुरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणाले होते. मग हे तुमचं कसं चालतं?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in