सोपलांविरोधात ईडीत दिलेली तक्रार मागे घे; अन्यथा जिवंत जाळीन  ः काँग्रेसच्या बार्शी शहराध्यक्षाला धमकी

अन्यथा मुलांबाळांसह जीवंत जाळून टाकीन, अशी धमकी दिली.
Withdraw the complaint lodged in the ED against Sopal; Otherwise burn alive ः
Withdraw the complaint lodged in the ED against Sopal; Otherwise burn alive ः

बार्शी (जि. सोलापूर) : माजी आमदार दिलीप सोपल यांच्याविरुध्द व नागेश अक्कलकोटे यांची सक्तवसुली संचलनालय कार्यालय मुंबई येथे दिलेली बेहिशेबी मालमत्ता चौकशीची तक्रार मागे घ्यावी, यासाठी बार्शीचे काँग्रेसचे शहराध्यक्षांचा मोबाईल बळजबरीने घेऊन त्यातील डेटा व्हायरल करीन. मुलाबाळांसह जीवंत जाळीन. बदनामी करीन अशी धमकी दिल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत नगर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बार्शीच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Withdraw the complaint lodged in the ED against Sopal; Otherwise burn alive : Threats to congress president of barshi)

नागेश हरिभाऊ अक्कलकोटे (विरोधी पक्षनेता, बार्शी नगरपालिका), राकेश उर्फ बाळू तातेड  (रा. सुभाषनगर, बार्शी), पंकज शिंदे (रा . कसबा पेठ, बार्शी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जीवनदत्त महादेव आरगडे (रा. जिजामाता कॉलनी, बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवारी (ता. २८ मे) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.

काँग्रेस पक्षाचे बार्शी शहर अध्यक्ष जीवनदत्त आरगडे हे भगवंत मंदिराकडे जात असताना तानाजी चौक येथील प्लाझा मंगल कार्यालयाजवळ तिघांनी अडवून माजी आमदार दिलीप गंगाधर सोपल यांच्याविरुध्द व नागेश अक्कलकोटे यांची सक्तवसुली संचलनालय कार्यालय मुंबई येथे दिलेली बेहिशेबी मालमत्ता चौकशीची तक्रार मागे घ्यावी. तसेच, आर्यन शुगर्स लि. खामगाव या साखर कारखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालय येथे कसलीही याचिका दाखल करु नये; अन्यथा मुलांबाळांसह जीवंत जाळून टाकीन, अशी धमकी दिली.

मोबाईल फोन घेऊन फोटो, रेकॉर्डिंग डेटा व्हायरल करुन तुझी बदनामी करीन असे म्हणून शिवीगाळ केली असल्याचे अदखलपात्र फिर्यादीत आरगडे यांनी म्हटले आहे. बार्शी पोलिस तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com