महाजनांना शिवसेनेचा आणखी एक धक्का : जळगावच्या तीन नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

एकनाथ खडसेनाराज नाहीत.
BJP corporators from Muktainagar join Shiv Sena on the advice of Eknath Khadse: Gulabrao Patil
BJP corporators from Muktainagar join Shiv Sena on the advice of Eknath Khadse: Gulabrao Patil

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरुनच मुक्ताईनगरमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. (BJP corporators from Muktainagar join Shiv Sena on the advice of Eknath Khadse: Gulabrao Patil)

दरम्यान, शिवसेनेने भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना आणखी एक धक्का दिला आहे. जळगाव महापालिकेतीन भारतीय जनता पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वी २९ नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केलेला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुक्ताईनगर भागातील वादळग्रस्त भागातील नुकसानीचा पाहणी दौरा केला. त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील भाजप नगरसेवकाच्या शिवसेना प्रवेशाविषयी सांगितले. 

या वेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यामुळे ते नाराज नाहीत. जळगाव महापालिकेतील भाजपच्या २९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तोच फॉर्म्युला आम्ही मुक्ताईनगर येथे राबविला आहे.
 

आणखी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

जळगाव महापालिकेतील भाजप ला गळती सुरूच आहे. जळगाव महापालिकेतील भाजपच्या २९  नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आज पुन्हा तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक  सुरेश सोनवणे, शोभा बारी, शेख हसीना शेख शरीफ या तीन भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, मोहन म्हासाळकर, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते.

जळगाव महापालिकेमध्ये अगोदर भाजपची एकहाती सत्ता होती. आता भाजपच्या निम्या नगरसेवकांचा गट शिवसेनेत आला आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपला गळती सुरू झाली आहे. त्यातच जळगाव भाजपचे आणखी 11 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असून लवकरच तेही शिवबंधन बांधणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com