... तर जयंत पाटलांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार

'सांडपाणी' हा शब्द वापरून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली
then will protest in front of Jayant Patil's house : Atul Khupse
then will protest in front of Jayant Patil's house : Atul Khupse

सोलापूर : उजनी (Ujani) जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला (Indapur) वळवण्याच्या निर्णयाला जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी स्थगिती देऊन तो आदेश रद्द करण्याची सूचना केल्याचे सांगितले. मात्र, त्याला आज चार दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा कुठलाही लेखी अध्यादेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे या ठिकाणीही त्यांची दिशाभूल जाणवू लागली आहे. उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा आदेश येत्या ता. 25 मे पर्यंत न निघाल्यास जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवास स्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे (Atul Khupse)यांनी दिला. (... then will protest in front of Jayant Patil's house : Atul Khupse)

खुपसे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील हक्काच्या उजनी जलाशयातील पाणी हे ‘सांडपाणी’ या गोंडस शब्दाचा वापर करून ता. 22 एप्रिल रोजी पाणी पळविण्याचा निर्णय झाला. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आक्रमक झाले आणि जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला.

शेतकऱ्यांच्या व शेतकरी नेत्यांच्या आक्रमकपणामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र, मंत्री जयंत पाटील यांनी ते वक्तव्य करून जवळपास चार दिवस उलटले आहेत. तरीही याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही. 

ज्याप्रमाणे 'सांडपाणी' हा शब्द वापरून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली व सोलापूरकरांना वेड्यात काढण्याचा निरर्थक प्रयत्न केला. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घेऊन माध्यमांसमोर व्हिडिओ देऊन पुन्हा एकदा दिशाभूल करू नका. येत्या पाच दिवसांत म्हणजे २५ मे पर्यंत हा अध्यादेश निघाला नाही, तर जयंत पाटील यांच्या निवास स्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खुपसे यांनी दिला आहे. 

या वेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापू मेटकरी, सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे, बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com