मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागणार का? संजय राठोडांनी दिले हे उत्तर...

या विषयासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन भेटायलाही जाणार आहे.
Sanjay Rathore said about rejoining the cabinet
Sanjay Rathore said about rejoining the cabinet

सोलापूर  ः राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करायचा की नाही, हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. कोणाला मंत्री करायचे किंवा कोणाला करायचे नाही, हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हाती असते, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. (Sanjay Rathore said about rejoining the cabinet)

माजी वनमंत्री संजय राठोड हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मुळेगाव तांड्यातील ‘सहविचार सभे'ला आज (ता. १२ सप्टेंबर) ते मार्गदर्शन करत होते. त्यावेळी त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात आपली वर्णी केव्हा लागणार आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले. दरम्यान, माजी वनमंत्री संजय राठोड यांचं बंजारा समाज बांधवांच्या वतीने मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले.

मागच्या युतीच्या सरकारमध्ये मी महसूल राज्यमंत्री होतो. त्या काळात आम्ही २५ मागण्या केल्या होत्या, त्याच आमच्या बंजारा समाजाच्या 25 मागण्यांची दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी आहे. या मागण्यासांठी मी राज्यभर फिरणार आहे. या विषयासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन भेटायलाही जाणार आहे, असे राठोड या वेळी म्हणाले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांना या विषयांसंदर्भात मी विनंतीही केली होती. त्यांच्या सूचनेनुसार त्यावेळी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत एक बैठकही झाली. त्यात आमच्या मागण्या समजून घेतल्या. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्या संदर्भात बैठक व्हावी, अशी समाजाची मागणी आहे. त्यानुसार मी ठाकरे यांना विनंती करणार आहे.

इंग्रजाच्या काळापासून गुन्हेगार जमात असा ठपका ठेवला गेला आहे. तेव्हाच्या १४ आणि आताच्या २८ जातीचे समाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न आहेत. स्वातंत्र्यानंतरही हे प्रश्न कायम आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या दोन्हींकडे हे प्रश्न प्रलंबित आहेत. ह्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी आमची मागणी आहे.

माजी मंत्री राठोड म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने 'भटके विमुक्त' खात्याचे नामकरण 'बहुजन विकास' केले आहे. असा बदल करू नये, अशी माझी वैयक्तीक भूमिका होती. इंग्रजाच्या काळापासून भटक्या विमुक्त जाती, जमाती असा शब्दप्रयोग होता. त्यामुळे तेवढी तरी आस्था ठेवायला हवी होती. त्यामुळे या नामांतराला विरोध होता.

छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. तसे तुम्हीही निर्दोष मुक्त व्हाल का. या प्रश्नावर राठोड म्हणाले की यांसदर्भात आता मी भाष्य करणे योग्य होणार नाही. येणाऱ्या काळात त्याचे उत्तर मिळेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com