सोलापूर शहराचे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोठेंकडे; ग्रामीण भागाचा नेता कोण? 

पालकमंत्री भरणे यांच्या काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी रिकामीच राहिली असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
Mahesh Kothe to lead NCP in Solapur city; Who is the leader of the rural area
Mahesh Kothe to lead NCP in Solapur city; Who is the leader of the rural area

सोलापूर : राज्यात सत्ता आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती झाली आहे. याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना मंगळवारच्या (ता. १५ जून) बैठकीत आला असेल. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कारकिर्दीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ना कामे मिळाली, सत्तेतील पक्ष म्हणून ना ताकद मिळाली. जिल्हा नियोजन समितीसह अन्य महत्वाच्या नियुक्‍त्याही रखडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक कामे जिल्ह्याबाहेरच्या ठेकेदारांना गेल्याची ओरड समोर येऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकासमोर आल्यानंतर आता पालकमंत्री भरणे यांच्या काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी रिकामीच राहिली असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. (Mahesh Kothe to lead NCP in Solapur city; Who is the leader of the rural area)

बारामती लोकसभा मतदार संघातील महत्वाचा फॅक्‍टरमधून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पाहिले जाते. बारामतीच्या जवळ असलेल्या पालकमंत्री भरणे यांना सोलापूरमधून हटावची मोहिम सुरु झाली. आपल्यालाही सोलापूरचे पालकमंत्रीपद नको, अशी मानसिकता भरणे यांनी करुन घेतली होती. मंगळवारच्या बैठकीत पालकमंत्रीपदाचा विषय तूर्तास प्रलंबित ठेवला गेला. राष्ट्रवादीची राज्यात सत्ता आहे, परंतु सोलापूर झेडपीत सत्ता नाही. जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणारा निधी असो की राज्य सरकारकडून येणारा विकासकामांचा निधी यामध्ये राष्ट्रवादीला सत्तेचा पुरेपूर उपयोग करुन घेता आला नाही. सर्वांना समान निधीचे तत्व अवलंबले असल्याने राष्ट्रवादीच्या सदस्यांना राज्यातील सत्तेचा फारसा व विशेष काही लाभ झाला नाही.

हेही वाचा : राष्ट्रवादीतील सुशीलकुमार शिंदेंच्या खबऱ्यांचा अजितदादा करणार बंदोबस्त
 
जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. या प्रमुख नेत्यांना एकसंध बांधणाऱ्या नेत्याची राष्ट्रवादीला सध्या खरी गरज आहे. एकसंध बांधणाऱ्या नेत्याची उणीव असल्याने आता सोलापूरच्या राजकारणात आणि विकासकामात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या ज्यावेळी सोलापूरच्या निवडणुकांमध्ये थेटपणे लक्ष घातले त्या त्या वेळी राष्ट्रवादीचा पराभव झाल्याच्याच अनेक घटना घडल्या आहेत. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने जसा महेश कोठे यांचा चेहरा निवडला आहे. तशी एकमुखी निवड ग्रामीण भागासाठी होऊ शकली नाही. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्यावर आगामी काळात राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी येण्याची चर्चा आहे. 


व्होट बॅंकेच्या सुरक्षेसाठी पर्याय 

पालकमंत्री भरणे यांना सोलापुरातून हटविल्यास धनगर समाजाचा मोठा रोष राष्ट्रवादीवर येण्याची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची फादर बॉडी, महिला, युवक व विद्यार्थी या आघाड्यांची जबाबदारी मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडे आहे. सोलापूर जिल्ह्यातील दुसरी निर्णायक व्होट बॅंक म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जाते. पालकमंत्री भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरुन हटविण्याचा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील धनगर समाजातील प्रभावी कार्यकर्त्याला किमान जिल्हा पातळीवर संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. माळशिरसचे नेते उत्तम जानकर यांच्या माध्यमातून व्होट बॅंक सोबत ठेवणे आणि मोहिते-पाटील गटाला त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणे, असा दुहेरी हेतू साधला जाण्याचीही शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com