राष्ट्रवादीतील सुशीलकुमार शिंदेंच्या खबऱ्यांचा अजितदादा करणार बंदोबस्त - Ajit Pawar will focus on factionalism in Solapur NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राष्ट्रवादीतील सुशीलकुमार शिंदेंच्या खबऱ्यांचा अजितदादा करणार बंदोबस्त

प्रमोद बोडके
बुधवार, 16 जून 2021

व्हिडिओमध्ये त्या नेत्याच्या अंगावर असलेला शर्ट आणि मंगळवारच्या (ता. 15 जून) बैठकीत त्या नेत्याने घातलेला शर्ट एकच निघाल्याने बैठकीत शांतता पसरली.

सोलापूर : सोलापूर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटबाजीचे अनेक किस्से वारंवार घडतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही मंगळवारी (ता. 15 जून) सोलापूर शहर राष्ट्रवादीतील गटबाजीची झलक अनुभवली आहे. आपल्याला एकदिलाने काम करायचे आहे, असे सांगत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गटबाजीचे कीर्तन तत्काळ थांबविण्यास सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीत महेश कोठे यांना सहकार्य करण्याचा आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देत आपला नवीन शिलेदार कोण? याचे संकेत दिले. (Ajit Pawar will focus on factionalism in Solapur NCP)
 
सोलापूर शहर राष्ट्रवादीसाठी नियुक्त केलेली सुकाणू समिती निष्क्रिय आहे. या समितीच्या बैठका होत नाहीत. शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केलेल्या विविध सेलच्या व फ्रंटच्या नियुक्‍त्या म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचा आरोप झाला आहे. या आरोपाला उत्तर देण्यासाठी कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याचा तो व्हिडीओ बाहेर काढला. सोलापुरातील विजय-प्रतापच्या कार्यालयात बसून केल्या जाणाऱ्या पक्षविरोधी कारवायाच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर मांडल्या. व्हिडिओमध्ये त्या नेत्याच्या अंगावर असलेला शर्ट आणि मंगळवारच्या (ता. 15 जून) बैठकीत त्या नेत्याने घातलेला शर्ट एकच निघाल्याने या व्हिडिओने बैठकीत शांतता पसरली.
 
हेही वाचा : मुख्यमंत्री हटाव मोहीम सुरू असल्याची ज्येष्ठ मंत्र्याची कबुली

राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष महेश गादेकर यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या खबऱ्यांचा विषय बैठकीत मांडला. बैठक झाल्यानंतर हे खबरे शिंदे यांना बित्तमबातमी सांगतील. खबरे बैठकीत असल्याचा मुद्दाही गादेकर यांनी मांडला. खबरे आजच्या बैठकीत आहेत का? असा प्रतिप्रश्‍न अजित पवारांनी विचारताच हो दोन खबरे उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. व्हिडिओ आणि शिंदे यांच्या खबऱ्यांमुळे राष्ट्रवादीची बैठक चांगलीच गाजली. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत प्रभावीपणे लक्ष घालण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. आगामी काळात या खबऱ्यांचा बंदोबस्त उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून होण्याची शक्‍यता आहे. 

 
गादेकरांचा तोच अनुभव विद्यमान पदाधिकाऱ्यांनाही 

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचे किस्से सोलापूर शहरभर सांगत सुटणाऱ्या राष्ट्रवादीतील नेत्यांमुळेच सोलापूर शहरात राष्ट्रवादीची म्हणावी तेवढी वाढ झाली नसल्याचा मुद्दा तत्कालिन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी वारंवार समोर आणला होता. या मुद्यावर चर्चा झाली; परंतु निर्णय झाला नाही. शिंदे यांच्या खबऱ्यांमुळे आता हा देखील मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. तत्कालिन अध्यक्ष गादेकर यांनी जे अनुभवले, तेच आताच्या पदाधिकाऱ्यांनाही अनुभवावे लागत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख