हा गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही - This Gopichand Padalkar is not afraid of anyone -vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

हा गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही

हुकूम मुलाणी
बुधवार, 21 जुलै 2021

आपण उघडपणे सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यास तयार आहे.

मंगळवेढा  (जि. सोलापूर) : गावगाड्यातील सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. तो न्याय सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी आपण उघडपणे सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यास तयार आहे. सोलापूर येथील कार्यक्रमातील घोंगडी बैठकीत माझ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला; परंतु हा गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना दिला. (This Gopichand Padalkar is not afraid of anyone : Padalkar )

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आमदार पडळकर हे मंगळवेढा तालुक्यात घोंगडी बैठका घेत आहेत. निंबोणी येथील बैठकीत आमदार पडळकर यांनी च्या दौऱ्यावर आहेत. 

ग्रामीण भागातील देवळाच्या वर्गणीची यादी गहाळ केल्यासारखे राज्य सरकारने 346 जातींचा समावेश असलेली ओबीसींची यादी न्यायालयात सादर करू शकत नाहीत, असे सांगितले आहे. यादी नाही म्हटल्यामुळे ती गहाळ केल्याचा आरोप विधान परिषद सदस्य पडळकर यांनी घोंगडी बैठकीच्या निमित्ताने केला. 

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना आव्हान देऊ पाहणाऱ्या अमित घोडांनी घेतला हा निर्णय

आमदार पडळकर म्हणाले की, राज्यातील सरकारच्या दुर्लक्षामुळे आज ओबीसींचे राजकारणातील आरक्षण गेले, उद्या नोकरीतीलही जाईल. त्यासाठी सर्व  समाजांनी जागृतपणे या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तयार राहावे. या छोट्या समाजाला भेटून त्यांच्या अडचणी जाणून राज्य सरकारच्या मानगुटीवर बसवण्यासाठी गावोगावी दौरे करत आहे. पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारकडून ओबीसींवर सातत्याने अन्याय केला आहे, त्यासाठी 346 जातीने आता जागृत व्हायला हवे.

राजकारणात ठराविक जातीचे वर्चस्व असल्याने अल्प असलेल्या समाजाला राजकीय आरक्षणापासून बाजूला ठेवल्यास खुल्या जागेत अल्पसंख्याक समाज टिकाव धरू शकत नाही. त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या जागेतून तो निवडणूक लढवू शकणार आहे, त्यातून तो आपले कर्तृत्व सिद्ध करणार आहे. गावगाड्यातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण उघडपणे सरकार विरोधी भूमिका घेण्यास तयार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात संघर्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. त्यानंतर पाच हा वर्षे निवडणुका नसल्यामुळे तुमच्या प्रश्नाची राज्य सरकारकडून दखल घेतली जाणार नाही. राज्य सरकारकडून सध्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात केवळ केंद्राकडे बोट दाखवले जात आहे, असा आरोपही आमदार पडळकर यांनी राज्य सरकारवर केला.

पडळकर यांनी मंगळवेढा (कोष्ठी, तेली वाणी), शनिवार पेठ (वडार, रामोशी, कैकाडी, गोंधळी) तामदर्डी (भोई) मुंढेवाडी (वाणी व  धनगर), बावची (जोशी),  निंबोणी (माळी, लोणारी), शिरनांदगी (नाभिक, धनगर), खडकी (अस्वलवाले, पारधी), लमांणतांडा खडकी (लमाण, बंजारा), हाजापूर (लोणारी, धनगर), खुपसंगी (मरिआई, गाडीवाले) या समाजाच्या घोंगडी बैठका घेतल्या. त्यांच्यासमवेत माजी सभापती प्रदीप खांडेकर, माऊली हळणवार, धनाजी गडदे, बापू मेटकरी, बिरुदेव घोगरे, भारत सलगर, दत्ता मुठेकर, सारिका सलगर आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख