इंदापुरात भाजपला आठवड्यात दुसरा धक्का 

भरणे यांना विरोध करुन भाजपशी संधान साधले होते.
Former Director of Chhatrapati Sugar Factory Bhausaheb Sapkal joins NCP
Former Director of Chhatrapati Sugar Factory Bhausaheb Sapkal joins NCP

वालचंदनगर  (जि. पुणे)  :  विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ हे आज (ता. २० जुलै) राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले. सपकळ यांच्या प्रवेशाने छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा होणार आहे. सपकळ यांच्या रुपाने इंदापुरात भाजपला आठवड्यात दुसरा धक्का बसला आहे. (Former Director of Chhatrapati Sugar Factory Bhausaheb Sapkal joins NCP)
 
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी दत्तात्रेय भरणे यांना विरोध करुन भाजपशी संधान साधले होते. निवडणुकीमध्ये त्या सर्वांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. निवडणूक निकालानंतर राज्यात तयार झालेल्या राजकीय परिस्थितीतून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.

या महाविकास आघाडी सरकारमध्ये इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. भरणे सहा खात्याचे राज्यमंत्री झाले आहेत. तसेच, सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

काही दिवसांपूर्वी इंदापूर पंचायत समितीचे सभापती प्रशांत पाटील आणि त्यांचे चिरंजीव संग्रामसिंह पाटील यांनी भाजपला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर सपकळ यांच्या रुपाने आठवडाभरातच भाजपच्या आणखी एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 

भाऊसाहेब सपकळ यांच्याबरोबर रवींद्र थोरात, गोपाळ सपकळ, शिवाजी सपकळ, जगन्नाथ सपकळ, रामभाऊ सपकळ, महेश सपकळ, गणेश सपकळ, वाल्मिक कोळी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

इंदापूर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराला मानणारा तालुका आहे. तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून विकासकामे आणली आहेत. तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मतभेद बाजूला ठेवून एकीने पक्षवाढीसााठी काम करण्याचे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

या वेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष सागर मिसाळ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com