भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांना दिले हे आश्वासन - BJP's central leaders gived this assurance to  Harshvardhan Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांना दिले हे आश्वासन

डॉ. संदेश शहा 
शुक्रवार, 16 जुलै 2021

या सर्व नेत्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.

इंदापूर :  राज्यातील विकास कामांसाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली भेटीत दिली असल्याची माहिती भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. (BJP's central leaders gived this assurance to  Harshvardhan Patil)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आज (ता. १६ जुलै) महाराष्ट्रातील नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पाटील यांनी या सर्व मंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा : राजकीय बाप म्हणून तुम्ही सांगाल ते ऐकेन; पण राजकारण सोडून...

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा रेल्वे, कोळसा तथा खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नूतन केंद्रीय मंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला. 

या सर्व नेत्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत पालखी मार्गांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. तसेच, विविध रस्ते, पूल, भुयारी मार्ग यांच्या कामासाठी मागणी केल्यानंतर तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख