शिवसेना आमदार आबिटकरांचा निर्णय होईना; पाठिंब्यासाठी महाडिक-पाटील गटात रस्सीखेच 

आपणही त्यात सहभागी होऊन भविष्यातील राजकीय अडचण ओढवून घ्यायची का? या मानसिकतेत आमदार आबिटकर आहेत.
Shiv Sena MLA Prakash Abitkar did not decide on the election of Gokul Dudh Sangh
Shiv Sena MLA Prakash Abitkar did not decide on the election of Gokul Dudh Sangh

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) विद्यमान संचालक आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी विरोधी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निवडणुकीत राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठिंब्यासाठी सत्तारुढ महादेराव महाडिक- पी. एन. पाटील गट आणि विरोधातील सतेज पाटील-हसन मुश्रीफ गट या दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, आमदार आबिटकर यांचे मात्र अजूनही निर्णय झाला नाही. 

गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे पाच संचालक फुटल्याने सत्तारूढ महादेवराव महाडिक गटाला मोठे खिंडार पडले आहे. शाहुवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे मतदार संघातील राजकीय विरोधक, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचा पाठिंबा मिळविण्यात सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांना यश आले आहे. 

आमदार प्रकाश आबिटकर यांचीही परिस्थिती सत्यजित सरूडकर यांच्यासारखी झाली आहे. विधानसभा मतदार संघातील त्यांचे सर्व विरोधक हे सतेज पाटील-हसन मुश्रीफ यांच्या शाहू शेतकरी विकास आघाडीकडे असताना आपणही त्यात सहभागी होऊन भविष्यातील राजकीय अडचण ओढवून घ्यायची का? या मानसिकतेत आमदार आबिटकर आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय झालेला नाही. 

आमदार पी. एन. पाटील यांनी सोमवारी (ता. 29 मार्च) त्यांच्याशी संपर्क केला, त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे समजते. विरोधी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मुंबईला गेल्याने आज हालचाली थंड झाल्या होत्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र कोल्हापुरातच ठाण मांडले असून ठरावधारकांबरोबरच तालुक्‍यातील नेत्यांशी त्यांनी संपर्क कायम ठेवला आहे. 

एक एप्रिल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 25 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गेल्या दोन दिवसांत 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या तीन दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुटीमुळे बंद आहे. उद्यापासून (मंगळवार, ता. 30 मार्च) ती सुरू होत असून गुरुवारी (ता. 1 एप्रिल) हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्याच अर्ज दाखल करण्यासाठी उमदेवारांची झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com