मुख्यमंत्र्यांच्या समोरच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले

व्यापाऱ्यांसह भाजपचे काही कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधीनिवेदन देणार होते.
 ShivSena, BJP .jpg
ShivSena, BJP .jpg

सांगली : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज सोमवार (ता. २ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच भाजपच्या कार्यकर्यांनी घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसेनेचे दोन गट घोषणाबाजी करत आमने-सामने आले होते. त्यामुळे झालेल्या गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सांगलीतील मुख्य पेठेत दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. (Shiv Sena-BJP workers shouting slogans during the Chief Minister's visit) 

मुख्यमंत्री आयर्विन पुलावरून कृष्णा नदीची पाहणी करून पेठेत आले. तेथे व्यापाऱ्यांसह भाजपचे काही कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी निवेदन देणार होते. पोलिसांनी दहा ते पंधरा संघटनांच्या प्रत्येकी पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठीची मुभा दिली होती, मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यानंतर प्रचंड गर्दी झाली. गोंधळ वाढू नये म्हणून सुरक्षा रक्षकांनी मुख्यमंत्र्यांना गराडा घातला. त्यावेळी गोंधळाला सुरुवात झाली. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन न स्वीकारताच पुन्हा गाडीत बसावे लागले. अन्य संघटनांना ही निवेदन देता आले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गोंधळ वाढत गेला आणि घोषणा देत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही संघटनांनी निवेदन देता न आल्यामुळे तेथेच निवेदन फाडून या प्रकाराचा निषेध केला. मुख्यमंत्री गाडीत बसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पेठांमध्ये रस्त्यावर बसून निषेध नोंदवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com