आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही ; दरेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे.
201darekar_thackerayff.jpg
201darekar_thackerayff.jpg

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. ''कोणत्याही पक्षाच बालेकिला कायम नसतो. निवडणुका येतील म्हणून आम्ही बूथ बांधणी सुरु केलेली नाही. आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही,'' अशी निशाणा दरेकर यांनी नाव ने घेता शिवसेनेवर केला आहे. 

सध्या कोरोना रूग्णांची संख्या राज्यात कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लवकरच निर्बंध हटवावे, कोरोनाच्या अटींबाबत सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, 
महाराष्ट्राचे दुर्दैव आहे दहा दिवस होऊनही सरकारने पूरग्रस्तांना दमडी दिलेली नाही, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

प्रविणे दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांच्या बाबत काय बोलायचे. संजय राऊत नशेत बोलत आहे असे मी म्हणालो तर..कोणीही अशी उत्तरे देऊ नयेत. बसमध्ये गर्दी चालते मग रेल्वे का सुरू करत आहे ? सेनाभवन समोर आंदोलन करण्यास आम्ही गेलो तेव्हा विरोध केला. नागपूरच्या संघ कार्यालया समोर काँग्रेस आंदोलन करत असताना त्यांना विरोध होणारच.''

कुणी अंगावर आलं तर त्याला सोडत नाही! फडणवीसांनी दिला इशारा
 
मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरून मोठं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी लाड यांच्यासह भाजपवर पलटवार करत जोरदार हल्ला चढवला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही झापड लगावण्याचा इशारा देत या वादात उडी घेतली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कुणी अंगावर आलं तर सोडत नाही, असं म्हणत शिवसेनेचे नाव न घेता टोला लगावला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com