'जयंत पाटलांना सांगा, गुडेवारांचा करेक्‍ट कार्यक्रम करायला' 

जयंत पाटील साहेबांना प्रत्यक्ष भेटून मी याबाबतची माहिती देईन.
Sangali Zilla Parishad's BJP  member demands transfer of Chandrakant Gudewar
Sangali Zilla Parishad's BJP member demands transfer of Chandrakant Gudewar

सांगली : "सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सरपंच मेळावा आणि रुग्णवाहिका प्रदान सोहळ्यावर मी बहिष्कार टाकला नव्हता. आमचे जवळचे पाहुणे वारले होते, त्यामुळे मला येता आले नाही. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांचा अपमान करण्याचा विषयच नाही,'' असा खुलासा सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केला. 

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (ता. 24 मार्च) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य संभाजी कचरे यांनी अध्यक्षा कोरे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी वरील खुलासा केला. 

संभाजी कचरे म्हणाले की, "प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान करण्याचा आणि सरपंच मेळाव्याला पालकमंत्री जयंत पाटील यांना आमंत्रित करून त्या कार्यक्रमावर अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी बहिष्कार टाकला. अध्यक्षा कोरे यांच्या या वर्तणुकीमुळे जयंत पाटील यांचा अपमान झाला आहे. तुम्ही स्वतः साहेबांना फोन करून बोलावले होते. तुमच्या पतीने मला निरोप दिला होता. अशावेळी तुम्ही आला नाहीत, हा पालकमंत्र्यांचा अपमान आहे. यात कोण कुठल्या पक्षाचे याचा विषयच येत नाही. त्याचा परिणाम साठ सदस्यांना भोगावा लागू शकतो. तुम्ही जयंतरावांना भेटून त्यांची माफी मागा.'' 

संभाजी कचरे यांच्या या मागणीवर अध्यक्षा कोरे म्हणाल्या, "माझे जवळचे नातलग त्या वेळी वारले होते. त्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकले नाही. जयंत पाटील साहेबांना प्रत्यक्ष भेटून मी याबाबतची माहिती देईन.'' प्राजक्ता कोरे यांनी सभागृहात ही भूमिका मांडल्यानंतर वादावर पडदा पडला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांना उद्देशून भारतीय जनता पक्षाचे शिवाजी डोंगरे म्हणाले की, ""तुमच्या साहेबांना (जयंत पाटील) सांगा आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचा निर्णय घ्या. ते नको तिथे करेक्‍ट कार्यक्रम करत बसले आहेत, त्यांना इथे करेक्‍ट कार्यक्रम करायला सांगा.'' 

हेही वाचा : गृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे 


पिंपरी : भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या ऍड जयश्री पाटील यांच्या याचिकेवर येत्या मंगळवारी (ता. 30 मार्च) सुनावणी होणार आहे. स्वतः पाटील यांनी ही माहिती बुधवारी (ता. 24 मार्च) "सरकारनामा'ला दिली. 

दरम्यान, देशमुख यांच्याविरुद्धच्या परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या (ता. 25 मार्च) सुनावणी होणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या दृष्टीने आगामी सहा दिवस खूपच महत्वाचे आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे लागलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com