जनसुराज्यचा भाजपला 'दे धक्‍का' : गोकुळनंतर झेडपीतही सतेज पाटलांसोबत जाण्याचा निर्णय 

या सर्व बदलात शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना कायम ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Jansurajya push to BJP : Decision to go with Satej Patil in ZP after Gokul
Jansurajya push to BJP : Decision to go with Satej Patil in ZP after Gokul

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे भाजपसोबत राहिलेल्या जनुराज्य शक्‍ती पक्षाने गुरुवारी (ता. 25 मार्च) भाजपसह सर्वच पक्षांना धक्‍का दिला. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलामध्ये पालकमंत्री सतेज पाटील हे ज्यांना संधी देतील, त्यांना जनसुराज्यच्या सात सदस्यांचा पाठिंबा राहिल, अशी घोषणा जनसुराज्य पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे पती तथा पक्षाचे गटनेते विजयसिंह माने आणि समाज कल्याण समितीचे माजी सभापती विशांत महापुरे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाने जिल्हा परिषदेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, पक्षाचे नेते, आमदार विनय कोरे यांनाही या पाठिंब्यासाठी तयार करू, असा विश्‍वास माने यांनी व्यक्‍त केला. या वेळी सदस्य अशोकराव माने उपस्थित होते. जनसुराज्य पक्षाच्या पाठिंब्यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ तब्बल 50 पर्यंत जाणार आहे. 

गोकुळच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय देत जिल्ह्याच्या राजकारणात धक्‍का दिला. तर आज पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतही कॉंग्रेसचे नेते तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जनसुराज्यने घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांचे कटटर समर्थक राजू मगदूम यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलात कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत राहण्याची घोषणा केली होती. पन्हाळा, शाहूवाडी मतदार संघाला निधी देताना पालकमंत्री पाटील यांनी कधीच हात आखडता घेतला नसल्यानेच पाठिंबा देत असल्याचे माने यांनी सांगितले. तसेच, या सर्व बदलात शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना कायम ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

दोन्ही मंत्र्यांनी तत्काळ बदल करावेत 

जिल्ह्यात सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडी भक्‍कम स्थितीत आहे. म्हणूनच जिल्हा परिषद पदाधिकारी बदलास विलंब लावण्याचे काही कारण नाही. जनसुराज्य पक्ष सोबत असल्याने पदाधिकारी बदलात कसलीच अडचण राहिलेली नाही. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी (हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील) हे बदल तत्काळ करावेत, अशी मागणीही माने यांनी केली. 

कंड्या पिकवणाऱ्यांना चपराक 

सत्ताधारी मंडळींपैकीच काही लोक मतांची फाटाफूट होईल, अशा कंड्या पिकवत आहेत. पदाधिकारी बदल होऊ नये, यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. मात्र माने यांच्या घोषणेने या कंड्या पिकवणाऱ्यांना चपराक बसली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com