ZP चे माजी अध्यक्ष म्हणतात, 'कोरोनाला हलक्‍यात घ्याल, तर जिवाला मुकाल' 

तुम्ही कोरोनाला हलक्‍यात घेऊ नका.... बाबांनो.
Former ZP president Vishwas Devkate appeals to abide by Corona rules
Former ZP president Vishwas Devkate appeals to abide by Corona rules

वडगाव निंबाळकर (जि. पुणे) : "कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने माझ्या घरातले दोन आणि गावातले आठ लोक मृत्युमुखी पडले आहेत. तेव्हा काळजी घेतली नाही, तर जिवाला मुकाल. तुम्ही कोरोनाला हलक्‍यात घेऊ नका.... बाबांनो. कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे यासाठी नियमांचे पालन करा,'' असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले आहे. 

बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर येथील येथील मुढाळे- वडगाव या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 29 लाख रुपये निधी मिळाला आहे. या कामाची सुरूवात माजी अध्यक्ष देवकाते यांच्या हस्ते झाली. तर गावांतील इतर विकास कामांसाठी एक कोटी 21 लाख रुपये निधी मिळाला आहे. त्या कामाची सुरुवात बारामती पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती नीता फरांदे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी देवकाते यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

या वेळी उपसभापती प्रदीप धापटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच सुनील ढोले, माजी सरपंच धैर्यशील राजेनिंबाळकर, सदस्य प्रमोद किर्वे, राहुल आगम, मोहन बनकर, अश्विनी खोमणे, राजश्री साळवे, स्वाती हिरवे आदी उपस्थित होते. 

या वेळी सरपंच ढोले म्हणाले, "गावातील विविध विकास कामांसाठी जागा देऊन सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना विशेष सन्मान गावच्या वतीने करण्यात येईल. गावातील रस्ते आणि शासकीय इमारती यांच्यासाठी ग्रामस्थांनीही थोडे द्यावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून अनेक कामे मंजूर झाली आहेत. निवडणुकीनंतर गटाचा विषय बाजूला ठेवून सदस्य मंडळाने एकत्र येऊन गाव कारभार चालवण्यास सहकार्य करावे.'' 

हेही वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा तो सल्ला उद्धव ठाकरे मानणार का? 

मुंबई : "राज्यातील आयपीएस अधिकारी जर भारतीय जनता पक्षालाच माहिती देतात, असं तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही तर राज्य करण्याच्या लायकीचेच नाहीत,'' अशा शब्दांत राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शरसंधान साधले. तसेच, ""तुमच्या विरोधात भूमिका घेणारे असे जे अधिकारी आहेत, ते मोडून काढायला पाहिजे,'' असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला. 

भारतीय जनता पक्षाकडून आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे, असा आरोप सत्तारुढ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे, असा प्रश्‍न ज्येष्ठ नेते मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले. 

माजी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, "जेव्हा स्वतःची चोरी पकडली जाते. जेव्हा अशा पद्धतीने शपथपत्र, ऍफिडेव्हीट बाहेर येतं. एखादं पत्र बाहेर येतं. तेव्हाच तुम्हाला हे सर्व आठवतं का? आयपीएस अधिकारी जर भारतीय जनता पक्षालाच माहिती देतात, असं तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही तर राज्य करण्याच्या लायकीचेच नाही. राज्यातील अधिकाऱ्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम भावना नाही. तुमच्या विरोधात ते भूमिका घेतात, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि राज्य करण्याची तुमच्यामध्ये शक्तीही नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com