...यामुळेच महाविकास आघाडी विरोधात उमेदवार दिला : राजु शेट्टी

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीतील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी आज पंढरपुरात आले आहेत.
Raju Shetty .jpg
Raju Shetty .jpg

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची भूमिका मान्य नसल्यानेच पंढरपूरपोट निवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला विरोध केल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता.४ एप्रिल) स्पष्ट केले.

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीतील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी आज पंढरपुरात आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज सकाळी संत नामदेव पायरी जवळून विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरचा आपला रोष व्यक्त केला.

या वेळी शेट्टी म्हणाले, राज्यात साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची सुमारे 3 हजार कोटींची एफ आर पी रक्कम थकीत आहे. ही रक्कम देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. लाॅकडाऊनमध्ये सरकारने भरमसाठ वीज बीलाची आकारणी करून लूट केली. वीज बिल माफ करावे यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी सरकारकडे मागणी केली, परंतु सरकारने दुर्लक्ष केले आहे. जो पर्यत  100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ केले जात नाही तो पर्यत सरकार विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेट्टींनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का विचारात घेतले नाही असा प्रश्न ही शेट्टींनी उपस्थित केला.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी नाहीत हे दुर्दैव आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या वेळी रविकांत तुपकर, तानाजी बागल, सचिन पाटील, विजय रणदिवे, शहाजन शेख, विष्णू भाऊ बागल, रणजित बागल आदी उपस्थित होते. 
 
 Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com