लाॅकडाऊनवरुन जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Jalgaon NCP Leader Satish Patil Oppose Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

लाॅकडाऊनवरुन जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 एप्रिल 2021

राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांबाबत ते म्हणाले, ''पक्ष बांधणीसाठी या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन तीन दिवस मुक्काम केला. परंतु कोरोना ची साथ वाढत असताना याच मंत्रांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन (Lock Down) करण्याचे सुचविले जाते आहे. मात्र हा उपाय होऊ शकत नाही, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते डाॅ. सतीश पाटील यांनी केली आहे

जळगाव : जळगावसह (Jalgaon) राज्यात कोरोना ची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मात्र त्याला लॉक डाऊन करून चालणार नाही.तर राज्यातील मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दोन दिवस आढवत घेवून प्रशासन गतिमान केल्यास परिस्थिती आटोक्यात येईल.असा घरचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी दिला आहे. Jalgaon NCP Leader Satish Patil Oppose Lock Down

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना (Corona) बाबत त्यांनी माजी पालकमंत्री म्हणून चिंता व्यक्त केली. सध्या शासन (Maharashtra Government) करित असलेल्या उपाय योजनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी पक्ष या गंभीर स्थितीत काम न करता टीका करीत आहे.हे बरोबर नाही.असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांबाबत ते म्हणाले, ''पक्ष बांधणीसाठी या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन तीन दिवस मुक्काम केला. परंतु कोरोना ची साथ वाढत असताना याच मंत्रांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन (Lock Down) करण्याचे सुचविले जाते आहे. मात्र हा उपाय होऊ शकत नाही. सरकारने प्रशासन गतिमान करण्यासाठी मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाठवून त्या.ठिकाणी तालुकानिहाय बैठका घेऊन आरोग्याचा आढवा घ्यावा,'' Jalgaon NCP Leader Satish Patil Oppose Lock Down

ते पुढे म्हणाले, ''आरोग्य यंत्रणा तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे पोलिस यंत्रणा गतिमान करावी. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत नियोजन होवून परिस्थिती आटोक्यात येईल.केवळ मुंबई त बसून निर्णय घेवून प्रशासन चालणार नाही.कारण आता परिस्तिथी आणीबाणीची आहे. त्यामुळे आता मंत्र्यांनी हलले पाहिजे. विरोधकांनी आता टीका न करता साथ दिली पाहिजे तरच ही स्थिती आटोक्यात येईल."

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख