माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नीचे निधन  - Former Minister Laxman Dhoble's wife dies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नीचे निधन 

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 4 मे 2021

शाहू शिक्षण संस्थेत मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या कामकाजावर त्यांनी लक्ष ठेवून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

मंगळवेढा : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे (वय 58) यांचे पुण्यात पहाटे चारच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. Former Minister Laxman Dhoble's wife dies

त्यांच्या पश्चात पती लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, मुलगी क्रांती आवळे, कोमल साळुंखे, जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे, सून शाॅरोन ढोबळे, नातवंडे असा परिवार आहे. शाहू शिक्षण संस्थेत मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या कामकाजावर त्यांनी लक्ष ठेवून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

हे ही वाचा : आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार

सावली फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांवरील संसारीक तणाव कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तर महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून जवळपास दहा हजार महिलांना पोस्टाची बचत खाती काढून देण्याचे काम त्यांनी केले आहे. 

लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवेढा, मोहोळ या विधानसभा मतदारसंघातून वीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधीही मिळाली होती. सुरुवातीला त्यांनी मंगळवेढा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मोहोळ मतदारसंघ राखीव झाला, त्या ठिकाणाहून त्यांना निवडणूक लढवलेली आहे. सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे.

हे ही वाचा : आता 'महाविकास'चा करेक्ट 'कार्यक्रम होणार' का? 

महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रभर पोचविण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी बहुजन रयत परिषद या संघटनेची स्थापना केली होती. संघटनेचे कार्यविस्तार महाराष्ट्रभर नेला आहे. हे कार्य पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने ढोबळे यांनी या संघटनेची जबाबदारी कन्या कोमल यांच्यावर सोपवली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख