माजी आमदारांनी रेती घाटावर टाकलेल्या छाप्यामुळे; वाळू माफियांना 79 लाखांचा दंड  

पूर्णा नदी पात्रांच्या जवळ असंख्य अवैध रेती साठे वाळू माफियांनी तैयार करुण ठेवले होते.
 Dilip Kumar Sananda,  .jpg
Dilip Kumar Sananda, .jpg

बुलडाणा : बुलडाणा जिल्हायात नदीपात्रातून अवैध व क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा होत असल्याने, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा  (Dilip Kumar Sananda) यांच्या सह महसुल अधिकाऱ्यांनी रेती घाटावर आणि वाळू साठ्यांवर धाडी टाकल्या, यामुळे वाळू माफियांमध्ये आणि महसुल विभागातही खळबळ उडाली होती. त्यानंतर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा केल्यामुळे रेतीसाठा करणाऱ्या कंत्राटदाराला ७९ लाख ८३ हजार ९५० रुपयांचा दंड थोटवण्यात आला आहे. (Sand mafia fined Rs 79 lakh) 

शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रांच्या जवळ असंख्य अवैध रेती साठे वाळू माफियांनी तैयार करुण ठेवले होते. याची माहिती सानंदा यांना मिलताच त्यानी तात्काळ याची मााहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली. त्यांच्या आदेशाने जिल्ह्यातिल सर्व अधिकारी व माजी आमदार यांनी अचानक रेती साठ्यावर धाडी टाकल्या त्यात हजारो ब्रास रेतीचे साठे आढळून आले. अधिकाऱ्यांनी ४ रेती साठे आणि ९ ठिकांनांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे केले होते. रेती घाटातून क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा केल्या जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे केली होती. 

या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी या ऑपरेशनची माहिती लीक न होऊ देता सानंदा यांनी शासकीय अधिकारी यांना सोबत घेत रेती घाटांवरील रेती साठ्यांवर धाडी घातल्या. त्यामुळे रेती माफीया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती.  

यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केली. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगावजामोद येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे, संग्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधिन अधिकारी तेजश्री कोरे, संग्रामपूरचे तहसीलदार विजय चव्हाण, यांच्यासह बांधकाम विभाग, महसूल विभाग वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

भास्तन येथे १२०० ब्रास रेतीसाठा साठवणुकीची परवानगी देण्यात आली. मात्र, या रेतीच्या ठिय्यावर प्रत्यक्षात १९०० ब्रास रेतीचा साठा आढळून आला. त्यामुळे याठिकाणी ७१० ब्रास रेतीसाठा अधिक आढळला. तर शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आली. नियमावलीनुसार एक मीटरपर्यंत उत्खन्नाची परवानगी असताना प्रत्यक्षात साडेसहा फुटापर्यंत रेतीचे उत्खनन करण्यात आले. महसूल आणि वन जमिनीवर देखील मोठ्याप्रमाणात उत्खनन करण्यात आले तर शासनाने जप्त केलेले रेतीचे साठे हि चोरीला गेल्याचे स्थळ निरिक्षणात समोर आले, अशी माहिती दिलीपकुमार सानंदा यांनी दिली होती. 

यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांनी २०२०-२१ साठी निश्चीत केलेल्या रेतीची सरासरी हातची किंमत २१६९ रु. प्रतिब्रास प्रमाणे होती. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अन्वये पाच पट दंड आकारणी निश्चीत करून रॉयल्टी आणि दंड असे एकूण  ७९ लक्ष ८३ हजार ९५० रुपये सरकारी खजीन्यात भरणा करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर दंडाच्या रकमेचा भरणा सात दिवसांत करण्याचे आदेश शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले आहेत.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com