मोठी बातमी : आणखी एका नगरपरिषदेत शिवसेनेचा भाजपला दे धक्का! 

पुन्हा एका नगरपरिषदेत भाजपला धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
 Sindkhedraja Municipality .jpg
Sindkhedraja Municipality .jpg

सिंदखेड राजा (बुलडाणा) : सिंदखेड राजा नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उपनगराध्यक्ष असलेल्या नंदाताई विष्णू मेहेत्रे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या १५ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एका नगरपरिषदेत भाजपला धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. (No-confidence motion against BJP Deputy Chairman Sindkhedraja Municipality)

सिंदखेडराजा नगरपरिषदेत भाजपची एकच जागा असताना सुद्धा शिवसेनेमुळे (Shiv Sena) त्यांना उपनगराध्यक्ष पद मिळाले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर या नगरपरिषदेत सुद्धा महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपला धक्का देण्याचे ठरवले आहे. सिंदखेड राजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सांगितले, सदर प्रक्रिया नगराध्यक्ष सतीश तायडे यांच्या देखरेखीखाली घडून येत आहे. (ता. ३१ मे) रोजी संध्याकाळी ५ वाजता सिंदखेड राजा नगरपरिषदेला उपरोक्त पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर नगराध्यक्ष यांनी दहा दिवसाच्या आत विशेष सभा बोलावून महाराष्ट्र राज्य अधिनियम नगर परिषद नगर पंचायत ५५ एक अ अनवे सदरील सभा बोलावून सभागृहातील दोन तृतीयांश बहुमताने मंजूर होतो.

तसे झाल्यास उपनगराध्यक्ष वरील अविश्वास प्रस्ताव पारित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की ''मेहेत्रे यांच्याविरुद्ध पुढील कारवाईसाठी नगरपरिषदेच्या सभेत अविश्वास ठराव मांडू इच्छितो, कारण सदर उपनगराध्यक्ष यांनी वारंवार नगरपरिषदेच्या विकास कामात सहभाग घेतलेला नाही. विकास कामाची मुद्दाम तक्रार करणे व त्यामध्ये अडचण निर्माण करणे, शहरातील विकास कामे न होऊ देणे, इतर सदस्यांना विश्वासात न घेणे मनमानी कारभार करून एकतर्फी निर्णय घेणे, नगर परिषदेच्या प्रशासकीय कामात मुद्दाम दखल घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नगर परिषद उपाध्यक्ष नंदा मेहेत्रे यांच्यावर अविश्वास मांडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करावे. यासाठी विशेष सभा बोलण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

नगर परिषदेत एकूण १७ नगरसेवक आहेत, त्यापैकी शिवसेनेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त आहेत. तर १७ नगरसेवकांपैकी शिवसेनाचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, भारतीय जनता पक्षाचे १, तर अपक्ष १ असे पक्षीय बलावल आहे, मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे त्याचे पडसाद सिंदखेड राजा नगरपरिषदेत सुद्धापडले आहेत. 

अविश्वास ठराव मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ नगरसेवकाची नावे पुढीलप्रमाणे, शिवसेना भीमा जाधव, राजेश आढाव, दिपाली मस्के, भिवसन ठाकरे, बालाजी मेहेत्रे, सुमन खरात, ज्योती मस्के तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक रूखमण बाई राधाची तायडे, चंद्रकला तायडे, गणेश झोरे, राजेश दत्तू आप्पा बोंद्रे, हजरा काजी शेख, अजीम गफार, बबन मस्के, सारिका मेहेत्रे, अशा एकूण पंधरा नगरसेवकांच्या सह्या या नोटीसीवर आहेत. सिंदखेड राजा नगरपरिषदेत राजकीय सत्ता बदलामुळे शहराच्या राजकारणात आता महाविकास आघाडीचे नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन होत, असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com