आमदार आवताडे लागले कामाला; कोविड रुग्णांच्या सोयीसाठी घेतली कलेक्टरची भेट - Pandharpur's  newly elected MLA Samadhan Avtade started working | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

आमदार आवताडे लागले कामाला; कोविड रुग्णांच्या सोयीसाठी घेतली कलेक्टरची भेट

हुकूम मुलाणी
बुधवार, 5 मे 2021

पंढरपुरात कोरोनाच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना त्यावर सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. 

मंगळवेढा : पंढरपूर (Pandharpur) विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Avtade) हे मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात सक्रिय झाले आहेत. नवनिर्वाचित आमदार आवताडे आज (ता. ५ मे) तातडीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांची भेट घेत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर उपाय योजना करण्याची मागणी केली. (Pandharpur's  newly elected MLA Samadhan Avtade started working)

पोटनिवडणुकीसाठीच्या निकालानंतर नूतन आमदार समाधान आवताडे हे सक्रीय झाले. त्यात ‘सरकारनामा’ने मतदार संघातील निवडणुकीचे विश्लेषण करताना आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर पुढील तीन वर्षात तालुक्यातल्या रखडलेल्या प्रश्नांची आव्हाने आहेत. त्याशिवाय सगळ्यात अगोदर कोरोना संकटाचा सामना करण्याची कसोटी लागणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर मंगळवारी आवताडे यांनी पंढरपुरात कोरोनाच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना त्यावर सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. 

हेही वाचा : राष्ट्रवादीचे देशमुख ठरले परिचारक गटाच्या देशमुखांना भारी

पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याबाबत आज सकाळी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमवेत भेट घेतली. 

मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी नवीन कोविड सेंटर उभारणे, पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत कोरोना तपासणीचे (टेस्टिंगचे) प्रमाण वाढविणे, ऑक्सिजनचा वाढीव साठा उपलब्ध करून देण्यास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सहमती दिली. सध्या रूग्णांची वाढती संख्या व त्याप्रमाणात अपुरी पडणारी रेमडेसिव्हीर इंजेक्शन, वेळेत उपलब्ध न होणारा ऑक्सिजन व लसींचा अपुरा पुरवठा यावरही चर्चा करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी विनंतीही आमदार आवताडे यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख