खबरदार : गावातील कोरोना आटोक्यात न आल्यास सरपंचपद धोक्यात येणार

दुसरी लाट येण्यामागे लोकांचा निष्काळजीपणाही तितकाच कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Sarpanch will be responsible for increasing the corona infection
Sarpanch will be responsible for increasing the corona infection

अकोला : राज्यातील कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अनेक नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. दुसरी लाट येण्यामागे लोकांचा निष्काळजीपणाही तितकाच कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तिसरी लाटही याच कारणांमुळे येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनही जागे झाले असून थेट कारवाईचे पाऊल उचलले आहे. (Sarpanch will be responsible for increasing the corona infection)

अकोला तालुक्यामध्ये गावांत गर्दी झाल्यास किंवा कोरोना नियमांचे पालन न झाल्यास थेट सरपंचांवरच अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. तसेच तलाशी व ग्रामसेवकांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक हादरले आहेत. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॅा. निलेश अपार यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. सध्या या आदेशाची राज्यभरात चर्चा सुरू आहे.

अपार यांनी काढलेल्या आदेशानुसार, गावांमध्ये अंत्यविधी, लग्नसमारंभ असे कार्यक्रम प्रशासनाची मान्यता न घेता आयोजित केल्याचे दिसून आले आहे. तसेच मान्यता घेतलेल्या काही कार्यक्रमांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असते. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. सामाजिक अंतर नसणे, मास्कचा वापर न करणे, हात न धुवणे या गोष्टींमुळे संसर्ग वाढण्यास मदतच होत आहे. गावाची सामाजिक व प्रशासकीय जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांच्यावरच आहे, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधितांनी गावामध्ये आयोजित कार्यक्रमात मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना तात्काळ द्यायला हवी. त्याठिकाणी कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. यामध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळून आल्यास सरपंद पद अपात्र करण्याची कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्याचप्रमाणे ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in