अबब! केवळ २८ अक्षरांमुळं गेले १८ हजार कोटी...कवितेचं कडवं पडलं महागात

एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक अकराशे वर्षांपुर्वीच्या कवितेतील काही ओळी टाकल्या होत्या.
Billionaire Wang Xing lost 2.5 billion dollars after posting a poem on social media
Billionaire Wang Xing lost 2.5 billion dollars after posting a poem on social media

बीजिंग : प्रतिस्पर्धी कंपनीला लक्ष्य करण्यासाठी चीनमधील एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक अकराशे वर्षांपुर्वीच्या कवितेतील काही ओळी टाकल्या. कवितेच्या या कडव्यामध्ये केवळ २८ अक्षरं होती. पण ही चिनी अक्षरं या अब्जाधीस अधिकाऱ्याला खूप महागाड पडली आहेत. त्यांना आपल्या संपत्तीतील तब्बल १८ हजार कोटींवर (२.५ अब्ज डॅालर्स) पाणी सोडावे लागले आहे. तसेच गुंतवणूकदारांचा रोषही ओढवून घ्यावा लागला. (Billionaire Wang Xing lost 2.5 billion dollars after posting a poem on social media)

मैइतून (Meituan) ही चीनमधील ई-कॅामर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी आहे. वँग झिंग हे या कंपनीचे CEO आहेत. मागील आठवड्यात त्यांनी सोशल मीडियावर चीनच्या पहिल्या सम्राटाने बंडखोरी मोडून काढण्यासाठी केलेल्या चुकीच्या प्रयत्नांवर आधारीत एक कविता टाकली होती. त्यांनी चीनमध्ये एकच खळबळ उडाली.

ही कविता सरकारविरोधात असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटू लागल्या. त्यानंतर दोन दिवसांतच त्याचे परिणाम झिंग यांना भोगावे लागले. शेअर मार्केटमधील कंपनीचे शेअर गडगडले. गुंतवणूकदारांमध्येही रोष निर्माण झाल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. झिंग यांना या कवितेतील २८ शब्दांचा फटका इतका जबर बसला की, त्यांना आपल्या संपत्तीतील १८ हजार कोटींहून अधिक रक्कम गमवावी लागली. 

सोशल मीडियावरील कवितेमुळे निर्माण झालेला वाद पाहून झिंग यांनी दोन दिवसांनी ही पोस्ट काढून टाकली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. झिंग यांच्यासह कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. दोन दिवसांत एक लाख ९० हजार कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. झिंग यांनी पोस्ट काढून टाकल्यानंतर सरकारविरोधात टीका करण्याचा कोणताही हेतू नसल्याचा खुलासा केला आहे. 

झिंग यांच्या पोस्टमुळे चीनमधील तंत्रज्ञान उद्योगालाही मोठी धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वीच चीन सरकारने जॅक मा यांच्या अलिबाबा ग्रुप आणि अँट ग्रुप या कंपन्यांवर कारवाई केली सुरू केली होती. त्यानंतर चीनमधील मार्केटला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर मैईतून कंपनीच्या बाबतीतही हेच घडल्याने या क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी झिंग यांच्या कृत्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com