यशवंतराव चव्हाणांना निपुत्रिक मुख्यमंत्री म्हणून हिणवले... पण त्यांनी हिंसक प्रतिक्रिया नाही दिली...

सध्याच्या राजकीय वातावरणात असे सौजन्य दुर्मिळच...
Yashvantarao-Venutai
Yashvantarao-Venutai

पुणे : थोबाडीत मारीन, कोथळा काढीन, बघून घेईन, तुमची घरे आम्हाला माहीत आहेत, अशा प्रकारची भाषा सध्या अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडी असताना एक नेतेमंडळींच्या सुसंस्कृतपणाविषयी शंका येत आहे. नेत्यांना असेच आक्रमक असावे लागते, असाही समज त्यामुळे पसरला आहे. (Maharashtra political culture turns violent in recent years) 

खरा सुसंस्कृतपणा काय, हे सांगणारा जुना प्रसंग या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या भवितव्याची पायाभरणी करणारे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्यासंदर्भातील ही घटना आहे. ज्येष्ठ पत्रकार, संपादक आचार्य अत्रे यांनी चव्हाण यांच्यावर कठोर भाषेत टीका करताना कधी मागेपुढे पाहिले नाही.  

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी तर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर मोठी टिका होत होती. या टिकेमध्ये प्र. के. अत्रे हे आघाडीवर होते. एकदा एका पत्रकाराने मराठामधील टिकेसंदर्भांत यशवंतरावांना प्रश्न विचारला तेव्हा चव्हाण साहेबांनी अत्यंत उत्तर दिले की, "अत्रेंची दर्जेदार साहित्यिक म्हणून माझ्या मनात असलेली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून मी मराठा वृत्तपत्र वाचतच नाही."

चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर अत्रे यांनी 'निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा' अशा मथळ्याचा यशवंतरावांवर टिका करणारा एक लेख लिहिला. या लेखाबद्दल ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला. यशवंतराव म्हणाले, “अत्रे साहेब तुम्ही मला निपुत्रिक म्हणता पण अहो मी निपुत्रिक नाही. `चले जाव` चळवळीवेळी मला अटक करण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही. त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं. या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला. तसंच गर्भशयाला देखील दुखापत झाली आणि त्याचमुळे पुन्हा मला मुल होण्यात अडचण आली.``

यशवंतराव चव्हाण यांचं फोनवरील बोलणं ऐकून आचार्य अत्रें यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली. आणि यशवंतरावांच्या घरी जाऊन वेणूताईसमोर अत्रेंनी पश्चातापही व्यक्त केला. पुढे जाहीरसभेतही त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या यशवंतनीती या फेसबुक पेजने हा प्रसंग पुन्हा उजेडात आणला आहे. या प्रसंगातून नेत्यांच्या विचारांची उंचीही त्यामुळे कळते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com