जन आशीर्वाद यात्रेत राणेंना फोन, म्हणाले, ''उन्होंने हवा कर दी सर!" 

मी यात्रेतच आहे. माझी तब्येत बरी नसल्याची त्यांनी हवा केली,'' असे राणेंनी मोबाईलवरुन राजनाथ सिंह यांना सांगितले.
Sarkarnama (32).jpg
Sarkarnama (32).jpg

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane आज जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग मध्ये आहेत. जन आशीर्वाद यात्रेत जनतेशी संवाद साधत असताना राणेंना भाजपचे ज्येष्ठ नेते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. यावेळी राजनाथ सिंह यांनी राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. नारायण राणे हे मोबाईलवरुन राजनाथ सिंह यांच्याशी शी बोलत असतांना त्यांना तेथे माध्यमांच्या कँमेऱ्यांनी टिपले. 

''माझी तब्बेत आता चांगली आहे, मी रुग्णालयात दाखल नव्हतो. मी रुग्णालयात गेलोच नाही. जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. मी यात्रेतच आहे. माझी तब्येत बरी नसल्याची त्यांनी हवा केली,'' असे राणेंनी मोबाईलवरुन राजनाथ सिंह यांना सांगितले. तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले. 

संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली.  राणे हे आज सिंधुदुर्ग येथे आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग देखील करण्यात येत आहे. यावर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

आशिष शेलार म्हणाले की, नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा (Janashirwad Yatra)  सिंधुदुर्गात (Sindhurg) पोहचली. राणे सिंधुदुर्गात दाखल झाल्यापासून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'सिंधुदुर्गात केलेली जमावबंदी राजकीय,’ असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ‘जमावबंदीचे आदेश कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी होती की राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी होते. राज्याला बंदीवान करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. त्यांच्याविरोधातील हा जनक्षोभ आहे. राणे यांच्या प्रेमामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.

आमच्या सभेला मोठी गर्दी ; शिवसेना शाखेसमोर फक्त 53 माणसं
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे  अनेक घडामोडी घडल्या, यामुळे राणे यांची जन आशीर्वाद यात्रा खंडित झाली होती. मात्र, कालपासून  यात्रा पुन्हा सुरू झाली असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सभेमध्ये  राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा टीका केली आहे. ते म्हणाले, आमच्या सभेला सात-आठ हजार माणसे, तर शिवसेना शाखेसमोर फक्त 53 माणसे दिसत आहेत. तर, एसटी कर्मचारी हे आत्महत्या करत आहेत आणि यांचे लक्ष माझ्याकडे असल्याचे सांगत त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना चिमटा काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com