भालके, आवताडे यांचे उमेदवारी अर्ज या कारणासाठी रद्द करा; हायकोर्टात याचिका दाखल

तक्रारदारयांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Petition filed in Mumbai High Court to cancel candidature of Bhagirath Bhalke and Samadhan Avtade
Petition filed in Mumbai High Court to cancel candidature of Bhagirath Bhalke and Samadhan Avtade

पंढरपूर  ः महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे या प्रमुख दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार मोहन हळणवर यांनी आक्षेप घेतला आहे. हे दोघे थकबाकीदार असून त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करावेत, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या उमेदवारीबाबतचा फैसला मुंबई उच्च न्यायालयात  होणार आहे. अॅड. अभिमान हाके यांच्यामार्फत हळणवर यांनी अपील केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूरच्या जागेवर पोटनिवडणूक लागली असून येत्या 17 एप्रिल रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने त्यांच्या विरोधात समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे. 

भगिरथ भालके हे पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे, तर समाधान आवताडे हे मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही साखर कारखान्यांनी चालू वर्षी गाळप केलेल्या उसाची एफआरपीची रक्कम दिली नाही. ऊस गाळप झाल्यापासून 14 दिवसांच्या आता एफआरपीची रक्कम संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही एफआरपीची रक्कम दोन्ही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन्ही साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई (मालमत्ता जप्तीची) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

भालके व आवताडे हे दोघेही सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत. अध्यक्ष असलेल्या त्यांच्या दोन्ही कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार अर्ज रद्द  करावेत, अशी तक्रार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहन ऊर्फ माऊली हळणवर यांनी 31 मार्च रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.

या तक्रार अर्जावर दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान आवताडे हे वैयक्तीक थकबाकीदार नसल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात तक्रारदार माऊली हळणवर यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com