तब्बल 43 दिवस चालत या पठ्ठयानं राज्य पिंजून काढलं; कारणही तुम्हाला भेडसावणारं

देशात दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.
Youth walks through 14 districts against fuel price hike in karala
Youth walks through 14 districts against fuel price hike in karala

तिरूअनंतपुरम : देशात दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. दरवाढीविरोधात प्रत्येकजण आपल्या पध्दतीनं नाराजी व्यक्त करतच असतो. पण एका पठ्ठयानं थेट चालत राज्य पिंजून काढण्याचं ठरवलं अन् ते करूनही दाखवलं आहे. केरळमधील या तरूणांनं 43 दिवसांत राज्यातील सर्व जिल्ह्यांत चालत फिरून इंधन दरवाढीनं लोकांना होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आहेत. (Youth walks through 14 districts against fuel price hike in karala)

अबिन थमारास्सेरी (Abin Thamarassery) असं या तरूणाचं नाव आहे. केरळमधील युवक काँग्रेसचा तो पदाधिकारी आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी त्याविरोधात रान उठवलं असलं तरी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी होताना दिसत नाहीत. सोशल मीडियातही याविरोधात सरकारला जोरदार ट्रोल केलं जातं. पण केंद्र सरकारकडून काँग्रेसकडं बोट दाखवत दरवाढीचं समर्थन केलं जात आहे. अबिन याने आगळ्यावेगळ्या पध्दतीनं इंधन दरवाढीला विरोध तर केलाच शिवाय लोकांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेतल्या. 

अबिन याने 20 जुलै रोजी केरळमधील कासारागोड जिल्ह्यातून आपल्या प्रवासाला सुरूवात केली. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये चालत प्रवास करण्यासाठी त्याला 43 दिवस लागले. बुधवारी त्याने हा आपला प्रवास संपवला आहे. या प्रवासादरम्यान त्याने इंधन दरवाढीमुळं सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाचे व्हिडीओही तयार केले आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर एक स्वतंत्र अहवाल तयार केला आहे.  ही माहिती मुख्यमंत्री पी. विजयन व राज्यपाल अरिफ मोहम्मद खान आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतिशन यांच्याकडे सादर केली जाणार आहे.

माध्यमांशी बोलताना अबिन म्हणाला, इंधनाचे दर खूप वेगानं वाढत आहेत. एक रिक्षाचालक दिवसभरात 600 रुपये कमावतो अन् इंधनावर 300 रुपये खर्च करतो. महामारीमध्ये माझ्यासह अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या प्रवासामध्ये मी भेटलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेत रेकॉर्ड केल्या आहेत, असं अबिन याने सांगितलं.

बुधवारी अबिन तिरूअनंतपुरममध्ये मंत्रालयाबाहेर आल्यानंतर विरोधी पक्षनेते सतिशन यांनी त्याची भेट घेतली. सतिशन यांनीही इंधन दरवाढवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, युपीए सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 70 रुपये प्रति लिटर एवढे होते. आता क्रुड तेलाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर 66 डॉलर असून पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. केंद्र सरकारनं इंधन दरवाढ केल्यानं सामान्य लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com