भाजपच्या सर्व आमदारांना आता केंद्राचे सुरक्षा कवच

निवडणुकीनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली.
West Bengal BJP MLAs to have Central security cover
West Bengal BJP MLAs to have Central security cover

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने मोठी ताकद लावत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकहाती किल्ला लढवत ही निवडणूक जिंकली. प्रचारादरम्यान अन् मतदानावेळी बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. ममतादीदींची सत्ता आल्यानंतर तर हा हिंसाचार उफाळून आला. भाजपचे काही नेते व कार्यकर्त्यांवरही हल्ले झाले. (West Bengal BJP MLAs to have Central security cover)

निवडणुकीनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. राज्याची कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळू लागल्याने चार जणांचे पथक पाठविण्यात आले. राज्यपाल जगदीप धनखर यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेत सुचना दिल्या. त्यानंतर आता केंद्र सरकारने भाजपच्या सर्व 77 आमदारांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) जवान आता भाजपच्या बंगालमधील आमदारांच्या दिमतीला असतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. ज्या आमदारांना आधीपासून कोणती ना कोणती सुरक्षा आहे, त्यांच्या सुरक्षेचा दर्जा वाढविण्यात येईल. ममतादीदींना पराभूत करणारे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना सध्या 'Z' सुरक्षाव्यवस्था आहे. तर 61 आमदारांना 'X' दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल. काही आमदारांना सध्या CISF च्या जवानांची सुरक्षा आहे. त्यांना 'Y' दर्जाची सुरक्षा देण्याचा प्रस्ताव आहे.

बंगालमध्ये हिंसाचार झाल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या चार सदस्यांच्या समितीने ही शिफारस केल्याचे समजते. भाजपला बंगालच्या विधानसभेत पहिल्यांदाच घवघवीत यश मिळाले आहे. मागील विधानसभेत भाजपचे केवळ तीन सदस्य होते. आता हा आकडा 77 वर पोहचला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मोठी ताकद पणाला लावली होती. त्यांना किमान 200 जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात यावेळीही ममतादीदींनी एकहाती बहुमत मिळवले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com