ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार 

कोरोनाच्या संकटात आलेलं दुसरं संकट म्हणजे म्युकोरमायकोसिस. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना हा आजार होत आहे.
1.jpg
1.jpg

मुंबई : कोरोनाच्या संकटात आलेलं दुसरं संकट म्हणजे म्युकोरमायकोसिस. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना हा आजार होत आहे. दोन दिवसापूर्वी सुरत (गुजरात) येथे म्युकोरमायकोसिसचे mucormycosis ४० रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. यातील ८ रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले आहेत. maharashtra mucormycosis fungal infection patient  

म्युकोरमायकोसिस या आजारांचे गांभीर्य ओळखून राज्य सरकाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकोरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी समावेश केल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 

म्युकोरमायकोसिस या आजाराचा संसर्ग नाक, तोंड या मार्गाने मेंदूपर्यंत होऊ शकतो. मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यावर उपचारांना एकदम मर्यादा येतात.  म्युकोरमायकोसिसवर Mucormycosis cases in maharashtra उपचार करण्यासाठी लागणारी अनेक औषधे महाग आहेत आणि मर्यादीत प्रमाणातच राज्यातील औषधांच्या दुकानांमधून उपलब्ध आहेत. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

या निर्णयामुळे कोरोनामुक्त झालेल्या म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहेय या रुग्णांना आता राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार मिळणार आहेत.  सध्या दररोज म्युकोरमायकोसिसचे साधारण दोन नवे रुग्ण आढळत आहेत. या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली अँटी फंगल औषधे अतिशय महाग आहेत.

या आचाराचा फैलाव विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात होत असल्याचे आढळले आहे. काल चंद्रपुर येथील १० रुग्णांना त्यांची बाधा झाली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.  अन्य ठिकाणच्या ३० रुग्णांवर मुंबईत केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

काळ्या बुरशीचा आजार असेही म्युकोरमायकोसिस या आजाराला म्हणतात. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना बुरशी येते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्युकोरमायकोसिस या आजाराला काळ्या बुरशीचा आजार असेही म्हणतात. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयांना बुरशी येते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. हळू हळू ते अवयव पूर्णपणे निकामी होतात. Mucormycosis cases in maharashtra

सध्या प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्या आणि रोगप्रतिकारक क्षमता दुर्बल असलेल्या अनेकांना म्युकोरमायकोसिसची लागण होत आहे. हा आजार संसर्गजन्य आजाराप्रमाणे (साथीच्या आजाराप्रमाणे) पसरण्याचा धोका डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. म्युकोरमायकोसिस या आजारात अंधत्व येण्याचा धोका आहे. रुग्णाच्या जगण्याची शक्यता जेमतेम ५० टक्के एवढीच आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com