मोदी, मल्ल्या अन् चोक्सीला मोठा झटका... नऊ हजार कोटीच्या संपत्तीवर टाच

'ईडी'कडून याबाबत बुधवारी माहिती देण्यात आली आहे.
Vijay Mallya Nirav modi mehul choksis assets worth 9371 crores transferred to banks
Vijay Mallya Nirav modi mehul choksis assets worth 9371 crores transferred to banks

नवी दिल्ली : फरार उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांची एकूण 9 हजार 371 कोटी रुपयांची संपत्ती सरकारी बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. तिघांनीही बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून आहे. याप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांची 18 हजार 170 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांनी फसवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत ही संपत्ती 80 टक्के एवढी आहे. (Vijay Mallya Nirav modi mehul choksis assets worth 9371 crores transferred to banks)

'ईडी'कडून याबाबत बुधवारी माहिती देण्यात आली आहे. तिघांचीही केवळ मालमत्ता जप्त करण्यात आली नसून त्यापैकी 9 हजार 317 कोटी रुपये सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे जमा करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलं आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी फसवणूक केल्याने बँकांचे तब्बल 22 हजार 585 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कर चुकवेगिरी प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या गटाला सहा हजार 600 कोटी मालमत्ता जमा करण्यात आली आहे. या संपत्तीतून बँकांना त्यांचे झालेले नुकसान भरून काढता येणार आहे. 

विजय मल्ल्या हा सध्या ब्रिटनमध्ये असून त्याचे भारतात प्रत्यार्पणासाठी केंद सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तेथील न्यायालयामध्ये ही प्रक्रिया सुरू असून सध्या त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. 2029 मध्ये ब्रिटनच्या तत्कालीन गृह सचिवांनी त्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिली होती. मल्ल्या 2 मार्च 2016 रोजी देश सोडून पळून गेला आहे. तर 2019 मध्ये त्याला आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले.

मेहूल चोक्सी व नीरव मोदी यांनी 13 हजार 500 कोटी रुपयांचे पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेत फसवणूक केली आहे. जानेवारी 2018 मध्ये ते दोघेही भारतातून पळाले. चोक्सी हा सध्या डोमिनिका देशात तुरूंगात आहे. तर मोदी हा ब्रिटनमधील तुरूंगात आहे. या तिघांनीही तब्बल 22 हजार 585 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तिघांच्याही प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com