UPSC ची पूर्व परीक्षा लांबणीवर; नवीन तारीख जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने कोरोना परिस्थिती पाहून नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.
UPSC postpones June 27 civil services preliminary examination
UPSC postpones June 27 civil services preliminary examination

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून अनेक राज्यांमध्ये लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. शाळा-महाविद्यालये मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. तसेच बहुतेक राज्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. (UPSC postpones June 27 civil services preliminary examination)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने कोरोना परिस्थिती पाहून नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा २७ जून रोजी होणार होती. आता नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी घेतली जाणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. या परीक्षेची जाहिरात यावर्षी चार मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पण त्याच काळात देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली.

कोरोनाचा कहर जूनअखेरपर्यंत आटोक्यात येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच आयोगाकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. मागील वर्षीही कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान पूर्व परीक्षा नियोजित होती. ही परीक्षाही पुढे ढकलून चार ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. 

दरम्यान, आयोगाने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार, यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत १६ परीक्षा नियोजित आहे. त्यामध्ये नागरी सेवा मुख्य परीक्षेचाही समावेश आहे. पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने ही परीक्षाही आता २०२२ मध्येच होऊ शकेल. इतर परीक्षांबाबत मात्र आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

राज्यातील ७३७ फौजदारांचे प्रशिक्षण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८ आणि खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ मधील एकूण पात्र ७३७ उमेदवारांना जून २०२१ पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले आहे. 

हे प्रशिक्षण कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील ३२२ उमेदवारांचे प्रशिक्षण सत्र दि. २१ जूनपासून सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा २०१८ मधील एकूण ३८७ उमेदवार तसेच २०१७ च्या प्रतीक्षा यादीतील २२ उमेदवार व सत्र क्रमांक ११८ मधील मुदतवाढ मिळालेले ६ उमेदवार अशा एकूण ४१५ उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण २४ जूनपासून सुरु करण्याचे गृह विभागाने प्रस्तावित केले असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com