राष्ट्रवादी, शिवसेनेसह प्रादेशिक पक्षांची फौज ममतादीदींच्या पाठिशी

आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरूध्द भाजप अशीच निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Shiv sena ncp backs mamata banerjee for upcoming assembly election
Shiv sena ncp backs mamata banerjee for upcoming assembly election

कोलकता : आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरूध्द भाजप अशीच निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी असली तरी त्यांचे अस्तित्व कमी दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने ममतादीदींना पाठिंबा दिला आहे. तसेच इतर सपा, आरजेडी या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावरून आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषदेत 291 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेसह आरजेडी, सपा या पक्षांनीही पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस व डाव्या पक्षांच्या आघाडीसाठी हा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच पाठिंबा दिला आहे. निवडणूक लढविणार नसलो तरी शिवसेनेचे कार्यकर्ते तृणमूलला प्रचारात मदत करतील, असे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे बंगालचे अध्यक्ष व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ''तृणमूलला ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे, त्यांचा बंगालमध्ये काहीही जनआधार नाही. इथे आम्ही सरकारचे अत्याचार सहन केले आहेत. स्थानिक पक्षांची त्यांची धोरणे असतात. बंगालमधील स्थिती उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रात निर्माण झाली असती तर तेथील पक्षांना अत्याचाराबाबत कळले असते. या पक्षांच्या समर्थनाने बंगालच्या राजकारणात काही फरक पडणार नाही.'' 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच  चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

तृणमूल काँग्रेसन आज 291 मतदारसंघांची उमेदवार यादी जाहीर केली. तृणमूलने त्यांच्या वाट्याला असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तृणमूलने तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चासाठी ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा परंपरागत भवानीपूर मतदारसंघ सोडला असून, त्या नंदिग्राममधून लढणार आहेत. त्या 10 मार्चला नंदिग्राममधून अर्ज भरतील. 

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आज विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, या यादीत भाजपचे खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांचा समावेश आहे. तृणमूलने भाजपला हा मोठा धक्का दिला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com