सरकारी कार्यक्रमात मंत्र्याचा भाऊच बनला मंत्री...

सरकारी कार्यक्रमामध्ये मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण या कार्यक्रमात सरकारी गाडीतून त्यांचे बंधू दाखल झाले.
Bihar Minister Mukesh Sahanis brother attended a govt program
Bihar Minister Mukesh Sahanis brother attended a govt program

पटना : हाजीपुर येथील सरकारी कार्यक्रमामध्ये मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण या कार्यक्रमात सरकारी गाडीतून त्यांचे बंधू दाखल झाले. त्यानंतर त्यांची मंत्र्यांप्रमाणे बडदास्त ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारावरून विरोधकांनी मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. 

बिहारमधील मंत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वादात अडकतात. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या मंत्रीमंडळात मुकेश सहनी हे पशु संवर्धन मंत्री आहेत. दोन दिवसांपूर्वी मत्स्य विभागाचा सरकारी कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम सहनी यांच्या उपस्थितीत होणार होता. पण त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या भावाला प्रतिनिधी म्हणून पाठविले. 

कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले जाणार होते. पण मंत्र्यांचे बंधून संतोष सहनी हे विभागाच्या सरकारी गाडीतून तिथे पोहचले. त्यांच्याच हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच संतोष यांना मंत्र्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात आल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी संतोष यांची बडदास्त ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 

हा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने मुकेश सहनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरून बिहार विधानसभेत मोठा गदारोळही झाला. सरकारी कार्यक्रमामध्ये मंत्र्यांच्या भावाने हजेरी लावत सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

यावर बोलताना मुकेश सहानी म्हणाले, अधिवेशन असल्याने मी कार्यक्रमात जाऊ शकत नव्हतो. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझे बंधू कार्य़क्रमात गेले. पण त्यांना पाठविण्यामागे कोणताही हेतू नव्हता. पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते माझे स्वागत करण्यासाठी तिथे आले होते. असे पुन्हा होणार नाही, याची खात्री देतो, असे सहानी यांनी स्पष्ट केले. 

मुकेश सहनी हे विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत चार जागा जिंकल्या आहेत. पण ते स्वत: या निवडणूकीत पराभूत झाले. भाजपने त्यांना आपल्या कोट्यातून 11 जागा दिल्या होत्या. पराभूत झाल्यानंतर सहनी यांना भाजपने विधान परिषदेत आणले. तसेच नीतिश कुमार यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही झाले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com