शरद पवार अन् प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती.
Sharad Pawar Meeting with Prashant Kishor in New Delhi
Sharad Pawar Meeting with Prashant Kishor in New Delhi

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू आहे. मागील दहा दिवसांत दोघांची ही दुसरी भेट असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या घरी ही बैठक सुरू असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. (Sharad Pawar Meeting with Prashant Kishor in New Delhi)

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण दहा दिवसानंतर दोघांमध्ये पुन्हा बैठक होत असल्याने या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.  

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या झालेल्या भेटीबाबत ते बोलत होते.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे. ती त्यांनी बोलून दाखवली आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली होती. 

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे यांनाही ते भेटले होते, पण ही भूमिका थेट नव्हती, अनौपचारिक केलेली मदत शिवसेनेला शिवसेनेला सत्तास्थापणेसाठी खूप फायदेशीर ठरली. 2024 च्या निवडणुका जरी लांबणीवर असला तरी त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापासूनच केलीय. अनेक बैठका, चर्चा, त्याचप्रमाणे मतदार त्यांच्याशी संवाद अशा पद्धतीची तयारी सध्या राष्ट्रवादीची तर सुरूच आहे. पण याच सोबत प्रशांत किशोर यांची साथ मिळाली ते 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यास मदत होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com