पायलट लवकरच भाजपमध्ये, माझं बोलणं झालंय! भाजपच्या नेत्याचा दावा

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणिसचिन पायलटयांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.
Sachin pilot will join BJP soon claims Senior Leader Rita Bahuguna Joshi
Sachin pilot will join BJP soon claims Senior Leader Rita Bahuguna Joshi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करून मोठा धक्का दिला. त्यांच्या आधी  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जोतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता राजस्थानमधील नाराज नेते सचिन पायलट यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने याबाबत दावा केला आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. 

त्यातच उत्तर प्रदेशातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपमध्ये येतील असा दावा केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, पायलट हे लवकरच भाजपमध्ये येतील. माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. उत्तर भारतामध्ये काँग्रेस पक्ष आता जवळपास संपला आहे. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात आलेली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सचिन पायलट यांनीही आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. दहा महिने होऊनही दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. समितीने मला आमच्या मागण्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, याचे आश्वासन दिले होते. पण सरकारचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. राजस्थामध्ये पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाज ऐकला जात नाही, हे दुर्दैवी आहे, अशी नाराजी पायलट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे. 

गेहलोत व पायलट यांना एकाचवेळी खूश ठेवणे पक्षासाठी कठीण जाऊ लागले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने हस्तक्षेप करुन समजूत काढल्याने पायलट आणि त्यांचे 18 बंडखोर पक्षात परतले होते. भाजपने पायलट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्यावेळी गेहलोत यांच्यासह काही नेत्यांनी केला होता. 

आता मागील काही दिवसांपासून पायलट समर्थकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. काही बैठका पायलट यांच्या निवासस्थानी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पायलट हे पुन्हा बंड करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पायलट यांनी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केल्याचे समजते. तसेच समर्थक आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. तोपर्यंत पुन्हा हे आमदार बंड करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आमदारांनी जुलै महिन्यापर्यंत श्रेष्ठींना अल्टीमेटम दिला जाऊ शकतो. त्यानंतर पायलट व हे आमदार पक्षात राहण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com